सिद्धनेर्ली भोंदूगिर सुधारित बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिद्धनेर्ली भोंदूगिर सुधारित बातमी
सिद्धनेर्ली भोंदूगिर सुधारित बातमी

सिद्धनेर्ली भोंदूगिर सुधारित बातमी

sakal_logo
By

निवडणूक स्पेशालिस्ट... कोंबडा आणि लिंबू...
सिद्धनेर्लीतील भोंदूंचे कारनामे; गोरगरिबांच्या प्रसादाने झाले गब्बर

पंडित कोईगडे ः सकाळ वृत्तसेवा
सिद्धनेर्ली, ता. २९ ः अंधश्रद्धेतून सांगलीतील हत्याकांडामुळे राज्यात खळबळ उडाली असताना येथील चार भोंदूंवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर पोलिसांमध्ये गुन्हा नोंद केला आहे. या भोंदूंच्या कारनाम्यांची खमंग चर्चा सुरू आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तक्रार केल्यामुळे भोंदूगिरांचा पर्दाफाश होणार आहे. नागरिकांच्या विविध समस्यांवर उपायांच्या बहाण्याने मंत्रतंत्र, गंडेदोरे, प्रसाद देण्याच्या नावाखाली उघडपणे केलेल्या फसवणुकीतून पैसे उकळून हे भोंदू गब्बर झाले आहेत. मात्र तक्रारीसाठी कुणीही पुढे येत नसल्याने त्यांनी चांगलेच हातपाय पसरले आहेत.
यातील सविता पाटील नदीकिनारा वसाहतीत राहतात. कालिमातेचा आपल्याला आशीर्वाद आहे. त्यांनी कालिमातेची प्रतिष्ठापना घरामध्ये केली आहे. काळे कपडे परिधान करून त्या भक्तांचा दरबार भरवत. स्मशानभूमीतील हाडे त्या एकत्र करून घरी आणून ठेवतात. अमावस्या, पौर्णिमेच्या वेळी मध्यरात्री स्मशानभूमी व नदीपात्रात अनेक विधी करतात. त्या बदल्यात भक्तांकडून भरमसाठ पैसा घेतात, अशी चर्चा आहे. राशिवडेतून सिद्धनेर्लीत स्थायिक झालेले बाजीराव लोहार हे जावईबापू ‘निवडणूक स्पेशालिस्ट’ म्हणून प्रसिद्ध आहेत. निवडणूक काळात राजकारण्यांची त्यांच्याकडे गर्दी असते. बाळू मगदूम यांचा गुरुवारी दरबार भरतो. काही वेळा ते भक्तांना अमानुष मारहाण करतात. भक्तांना नारळ-लिंबू आणावयास सांगतात. त्यावर हळद-कुंकू लावून ते भक्तांना परत करतात. काहीजणांना कोंबडासुद्धा कापण्यास सांगतात. रेणुकाभक्त म्हणून प्रसिद्ध असलेले कृष्णात भोसले हे काही वर्षांपूर्वी ट्रॅक्टरवर चालक होते. या माध्यमातून त्यांनी बस्तान बसवून स्वतःचे दोन ट्रॅक्टर ऊस वाहतुकीसाठी केले आहेत. ते मोबाईलवरूनही समस्यांचे निराकरण करतात, अशी नागरिकांत चर्चा आहे.
या मंडळींकडील आलिशान गाड्यांच्या वावराने स्थानिक नागरिकांना त्रास होत आहे. तक्रार करून वाईटपणा कशाला घ्यायचा म्हणून ते गप्प आहेत. याशिवाय गावामध्ये किरकोळ प्रमाणात भोंदूगिरी करणाऱ्या मंडळींचा सुळसुळाट आहे. हेच लोण आजूबाजूच्या गावांत पसरले आहे.

तक्रारी देण्याचे आवाहन
सिद्धनेर्लीसारख्या पुरोगामी गावात भोंदूंचे प्रस्थ वाढले आहे. त्यांच्या जाळ्यात अनेक जण फसले आहेत. मात्र बेअब्रुच्या भीतीने तक्रारीसाठी कोणीही धजावत नाही. त्यांच्या या ‘तेरी भी चूप-मेरी भी चूप’ वृत्तीमुळे या भोंदूगिरांचे फावत आहे. आता तरी फसलेले भक्त तक्रारीसाठी पुढे येतील का, हा खरा प्रश्न आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Sdr22b01689 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..