व्हन्नूर कुस्ती मैदान बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्हन्नूर कुस्ती मैदान बातमी
व्हन्नूर कुस्ती मैदान बातमी

व्हन्नूर कुस्ती मैदान बातमी

sakal_logo
By

व्हन्नूरला दीडशेहून अधिक कुस्त्या
सिद्धनेर्ली,ता,४ःव्हन्नूर (ता. कागल)येथील मैदानात प्रथम क्रमांकाची पुण्याच्या सुनील फडतरे विरुद्ध कुर्डूवाडीचा महारुद्र कालील यांच्यतील कुस्ती पंधरा मिनिटांच्या लढतीनंतर बरोबरीत सोडविली. तर दुसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत कोल्हापूरचा मारुती सुरवसे यांने अक्षय शिंदेला पंधराव्या मिनिटाला पोकळ घिस्सा डावावर चितपट केले. मात्र, त्याच्या आयुष्यातील ही शेवटची कुस्ती ठरली. या कुस्तीनंतर रात्री उशिरा हृदयविकाराने त्याचे निधन झाले. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .
या मैदानात अन्य लहान मोठ्या दीडशेहून अधिक कुस्त्या झाल्या. दसरा उत्सव समितीने दसऱ्यानिमित्त या मैदानाचे आयोजन केले होते. मैदानाचे पूजन बंडा लोहार यांच्या हस्ते करण्यात आले.
या मैदानातील अन्य विजयी पैलवानांची नावे अशी आहेत. किरण पाटील(ईस्पुर्ली ), अक्षय मुळीक (दऱ्याचे वडगाव), अंकुश खतकर (कुर्डूवाडी), अनिल पाटील, पृथ्वीराज निकम, संदेश बोराटे, संतोष बोराटे, संदेश करपे, ओंकार जाधव, समर्थ खाडे, साईराज बोराटे (सर्व व्हन्नूर)
राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेते राम सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान झाले. पंच म्हणून शंकर मेडसिंगे, शंकर गोनुगडे ,संभाजी मगदूम,कुमार पाटील, आप्पासो निकम, प्रवीण निकम, संभाजी निकम, राजू निकम ,दत्तात्रय बोराटे, आकाश पाटील, युवराज निकम यांनी काम पाहिले. सर्जेराव मोरे यांनी निवेदन केले.