सिद्धनेर्ली येथे संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त करियर व व्यवसाय विषयक मार्गदर्शन कार्यक्रमाने दिला वैचारिक फराळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिद्धनेर्ली येथे संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त करियर व व्यवसाय विषयक मार्गदर्शन कार्यक्रमाने दिला वैचारिक फराळ
सिद्धनेर्ली येथे संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त करियर व व्यवसाय विषयक मार्गदर्शन कार्यक्रमाने दिला वैचारिक फराळ

सिद्धनेर्ली येथे संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त करियर व व्यवसाय विषयक मार्गदर्शन कार्यक्रमाने दिला वैचारिक फराळ

sakal_logo
By

02426
सिद्धनेर्ली : येथे स्वप्नील माने यांची आयपीएस अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना मान्यवर.

सिद्धनेर्लीत करिअरविषयक मार्गदर्शन
सिद्धनेर्ली, ता. ३१ ः येथील दि सिद्धनेर्ली को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी संस्थेने चौथ्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थी व तरुणांसाठी व्यावसायिक व करिअरविषयक मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करून वैचारिक फराळाची मेजवानी दिली. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन विक्रम पाटील होते.
लेखक व शैक्षणिक मार्गदर्शक डॉ. ताहीर झारी यांचे ''व्यवसाय शिक्षण व व्यक्तिमत्व विकास'' विषयावर व्याख्यान झाले. स्वप्नील तुकाराम माने यांची आयपीएस अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल संस्थेकडून सत्कार झाला. त्यांनी ''करिअर कसे निवडावे'' विषयावर मार्गदर्शन केले. निसर्ग व पर्यावरण संघटना, लम्पी आजारावर काम करणारे पशुवैद्यकीय अधिकारी, जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार विजेत्या सौ. शोभा आगळे यांचा संस्थेकडून सत्कार झाला. रक्तदाते व मार्च २०२२ दहावी बोर्ड परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रांजल फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व रक्तदात्यांना फळझाड देऊन गौरवले. माजी शिक्षक टी. टी. वैराट, जी. एम. भोसले, एम. डी. कांबळे यांचा विशेष सन्मान केला.
यावेळी संस्थेचे संचालक, सभासद, १९९३ दहावी मार्चमधील वर्गमित्र, सिद्धनेर्ली विद्यालय व प्रियदर्शनी इंदिरा विद्यालयातील सर्व विद्यार्थी, एस. एल. पवार, माजी सरपंच एम. बी. पाटील, उपसरपंच सौ. संगीता पवार व ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत व प्रास्तविक व्हाईस चेअरमन सुदाम पाटील यांनी केले. सूत्रसंचालन विवेक पोतदार यांनी केले. एम. पी. गोनुगडे यांनी आभार मानले.