सिद्धनेर्ली विद्यालय बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिद्धनेर्ली विद्यालय बातमी
सिद्धनेर्ली विद्यालय बातमी

सिद्धनेर्ली विद्यालय बातमी

sakal_logo
By

02470
सिद्धनेर्ली ः लॅब उद्घाटनवेळी बोलताना एकनाथ आंबोकर. व्यासपीठावर सुहासिनीदेवी घाटगे, संचालिका नवोदिता घाटगे, प्रा. सुनील मगदूम आदी.

अटल टिंकरिंग लॅबमधून
वैज्ञानिक घडतील ः आंबोकर

सिद्धनेर्ली, ता. २४ ः अटल टिंकरिंग लॅबच्या वापरातून भविष्यात अनेक विद्यार्थी वैज्ञानिक घडतील, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी केले. ते सिद्धनेर्ली विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये अटल टिंकरिंग लॅबचे उद्घाटन व गुणवंतांचा सत्कारवेळी बोलत होते. लॅबचे उद्घाटन शाहू कारखान्याचे चेअरमन सुहासिनीदेवी घाटगे यांच्या हस्ते झाले. दहावी, बारावी, एनएमएमएस परीक्षा, चित्रकला व एनसीसीमध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार केला.
आंबोकर म्हणाले, ‘मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात शिक्षण द्या. पुस्तकी ज्ञानाबरोबर सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून ज्ञान मिळवावे.’ संचालिका सौ. नवोदिता
घाटगे म्हणाल्या, ‘शॉर्टकटने यश मिळणार नाही. प्रेझेंटेशन करताना भाषेचे बंधन नको.’ यावेळी एन. के. मगदूम, एस एल. पोवार, शिवा घराळ, श्रीमती लक्ष्मीदेवी गोनूगडे, बळीराम मगदूम ,के. ए. घराळ, जी. आर. हजारे, प्रशासन अधिकारी कर्नल वेसवीकर, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. मुख्याध्यापक ए. पी. सारंग यांनी स्वागत केले. प्रा. सुनील मगदूम यांनी प्रास्ताविक केले. पर्यवेक्षक एस. आर. मगदूम यांनी आभार मानले.