Wed, Feb 8, 2023

बामणीत समरजित घाटगे विरूध्द मुश्रीफ गट
बामणीत समरजित घाटगे विरूध्द मुश्रीफ गट
Published on : 13 December 2022, 2:55 am
बामणीत समरजित घाटगे विरुद्ध मुश्रीफ गट
सिद्धनेर्ली : बामणी (ता. कागल) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे गटाच्या अनुराधा मारुती पाटील व आमदार हसन मुश्रीफ गटाच्या मनीषा युवराज पाटील यांच्यामध्ये थेट दुरंगी लढत होत आहे.
या ठिकाणी राजे गटासोबत मंडलिक गटातील व बाबा गटातील एक गट श्री शिव शाहू समविचारी ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातून लढत आहे, तर विरोधात मुश्रीफ गटासोबत मंडलिक व बाबा गटातील एक गट व शेतकरी संघटना यांची शेतकरी विकास आघाडीच्या माध्यमातून लढत होत आहे. प्रभाग क्रमांक एकमधील मागासवर्गीय प्रवर्गातून एका अपक्षासह तीन उमेदवार रिंगणात आहेत, तर अन्य आठ जागांवर सोळा उमेदवारांमध्ये थेट दुरंगी लढत होत आहे. एकूण १९४५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.