वंदूरच्या पाटील यांना विशेष सेवा पदक बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वंदूरच्या पाटील यांना विशेष सेवा पदक बातमी
वंदूरच्या पाटील यांना विशेष सेवा पदक बातमी

वंदूरच्या पाटील यांना विशेष सेवा पदक बातमी

sakal_logo
By

02499

अभिजित पाटील यांना
विशेष सेवा पदक
सिद्धनेर्ली : वंदूर (ता. कागल) येथील रहिवासी व सध्या ठाणे शहर येथे सहायक पोलीस निरीक्षक असलेले अभिजीत बाळासो पाटील यांना महाराष्ट्र शासनाचे विशेष सेवा पदक जाहीर झाले. राज्य शासनाच्या गृह विभागाकडून गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त जिल्हयात नक्षलवाद्यांच्या हिंसक व बेकायदा कारवायांना परिणामकारकरीत्या आळा घालण्यासाठी विहीत कालावधी पूर्ण केला असल्याने विशेष सेवा पदक जाहीर झाले. पाटील २०१३ मध्ये पोलिस सेवेत उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले. सध्या ते सहायक पोलिस निरीक्षक पदावर कोनगाव पोलीस ठाणे, ठाणे येथे कार्यरत आहेत.