Sun, Feb 5, 2023

धैर्यशील इंगळे यश बातमी
धैर्यशील इंगळे यश बातमी
Published on : 12 December 2022, 5:27 am
02504
धैर्यशील इंगळेला रौप्यपदक
सिद्धनेर्ली ः वंदूर (कागल) येथील धैर्यशील बाळासाहेब इंगळे याने शिवाजी विद्यापीठांतर्गत आंतरविभागीय वेटलिफ्टींग स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. शिवराज महाविद्यालय गडहिंग्लज येथे स्पर्धा झाल्या. धैर्यशील तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट अॅन्ड टेक्नॉलॉजी, वारणानगरचा विद्यार्थी आहे. याला प्रशिक्षक के. बी. कुरणे, प्राचार्य डॉ. एस. वी. आणेकर व तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट अॅन्ड टेक्नॉलॉजी वारणानगरचे शिक्षकांचे मार्गदर्शन झाले.