Wed, Feb 1, 2023

तायक्वांदो स्पर्धा यश बातमी
तायक्वांदो स्पर्धा यश बातमी
Published on : 22 December 2022, 12:44 pm
02525
सिद्धनेर्ली ः सीनियर तायक्वांदो स्पर्धेत यश मिळविलेले खेळाडू.
तायक्वांदो स्पर्धेत यश
सिद्धनेर्ली ः तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रमार्फत घेतलेल्या राज्यस्तरीय सीनियर तायक्वांदो स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याने तिसऱ्या क्रमांकाची चॅम्पियनशिप मिळविली. छत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे येथील स्पर्धेत प्राजक्ता रणदिवेने ४९ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक, कोमल पोवारने ५३ किलो वजनी गटात तृतीय क्रमांक तर धनश्री घराळने ७३ किलो वरील गटात प्रथम क्रमांक मिळविला. त्यांची पुद्दूचेरी येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. धनश्री घराळ श्री छत्रपती शाहू कारखाना मानधनधारक खेळाडू आहे. खेळाडूंना प्रशिक्षक उमाजी पोवार यांचे मार्गदर्शन झाले.