शेंडूर येथे शुक्रवारी कुस्ती मैदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेंडूर येथे शुक्रवारी कुस्ती मैदान
शेंडूर येथे शुक्रवारी कुस्ती मैदान

शेंडूर येथे शुक्रवारी कुस्ती मैदान

sakal_logo
By

शेंडूर येथे शुक्रवारी कुस्ती मैदान
सिद्धनेर्ली : शेंडूर (ता. कागल) येथे गहिनीनाथ उरुसानिमित्त कोल्हापूर जिल्हा व शहर तालीम संघाच्या मान्यतेने शुक्रवारी (ता. १७) कुस्ती मैदानाचे आयोजन केले आहे. केंद्रशाळा परिसरात हे निकाली कुस्ती जंगी मैदान ग्रामपंचायत शेंडूर व ग्रामस्थांतर्फे आयोजित केले आहे. या मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती विक्रम शेटे (इचलकरंजी) विरुद्ध अरुण बोंगार्डे (बानगे), द्वितीय क्रमांकाची कुस्ती शशिकांत बोंगार्डे (बानगे) विरुद्ध सुनील खताळ (कोल्हापूर), रोहन रंडे (मुरगूड) विरुद्ध लिंगराज होणमाने (कोल्हापूर) यांच्यात होईल. तसेच मैदानात इतर शंभरहून अधिक कुस्त्या होणार आहेत. बाळासो मेटकर, नामदेव बल्लाळ, रवींद्र पाटील, के. बी. चौगुले पंच म्हणून काम पाहणार आहेत.