
सिद्धनेर्ली बातमी
02771
सिद्धनेर्लीः येथील रस्ता कामाच्या प्रारंभप्रसंगी सरपंच दत्तात्रय पाटील व इतर
...
सिद्धनेर्ली येथे रस्ता कामाचा प्रारंभ
सिद्धनेर्ली ः येथे पवार वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचा प्रारंभ सरपंच दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार हसन मुश्रीफ यांच्या निधीतून या रस्त्यासाठी तीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या वसाहतीतील कमी लोकसंख्येमुळे या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र सरपंच पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा रस्ता होत आहे. त्याबद्दल या नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. याप्रसंगी मधुकर येवलुजे, शाहीर सदाशिव निकम यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपसरपंच वर्षा आगळे, ग्रामपंचायत सदस्या वनिता पवार, मनोहर लोहार, तानाजी पाटील, सुरेश पाटील, सुभाष मगदूम, वसंत पाटील आदी उपस्थित होते. स्वागत युवराज खद्रे यांनी केले. आभार उमाजी पवार यांनी मानले.