करनूर विद्यार्थी उपकरण निवड बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करनूर विद्यार्थी उपकरण निवड बातमी
करनूर विद्यार्थी उपकरण निवड बातमी

करनूर विद्यार्थी उपकरण निवड बातमी

sakal_logo
By

02780,02779
...

रामकृष्णनगर प्राथमिक शाळेच्या उपकरणास
राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक

सिद्धनेर्लीः करनूर पैकी रामकृष्णनगर (ता.कागल) येथील प्राथमिक शाळेच्या पर्यावरण पूरक कागद उपकरणास ५० व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळाला. राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन स्पर्धेसाठी या उपकरणाची निवड झाली. ही स्पर्धा ऑनलाइन झाली. या उपकरणास दिल्ली येथे होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनात साहित्य मांडण्याची संधी मिळणार आहे. अवधूत संजय कांबळे याने याचे सादरीकरण केले. शिक्षिका विद्या संतोष आयरे यांनी विशेष परिश्रम घेतले. शिक्षणाधिकारी आशा उबाळे, दिगंबर मोरे, गटशिक्षणाधिकारी गणपती कमळकर, विस्तार अधिकारी सारिका कासोटे, केंद्रप्रमुख सुनंदा किनेकर शाळेचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. गवत, हराळी, शेतातील तण, भेंडीचा चिकट द्रव, तसेच कोरफडीचा गर या टाकाऊ वस्तूंपासून याचे मिश्रण तयार करून त्यापासून कागद निर्मिती करता येते. त्यामुळे सुरु, पाईन, निलगिरी यासारख्या वृक्षांची होणारी तोड थांबून पर्यावरण रक्षण करता येते. प्रदूषणही होत नाही, हे या उपकरणातून दाखवले आहे.