
अज्ञात कीटकाच्या दंशाने बामणीतील महिलेचा मृत्यू बातमी
विषारी कीटकाच्या दंशाने महिलेचा मृत्यू
सिद्धनेर्लीः बामणी (ता. कागल) येथे एका महिलेचा विषारी कीटकाच्या दंशाने मृत्यू झाला. संगीता ज्योतीराम मगदूम (वय ४८) असे त्यांचे नाव आहे. त्यांना नेमका कशाने दंश केला हे समजले नाही. त्यामुळे शिवविच्छेदनानंतर व्हीसेरा राखून ठेवण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, मगदूम या सायंकाळी सहाच्या सुमारास शेण काढून परतत असताना सरपणासाठी ठेवलेली नारळाची शेंडी घेत असताना त्यांना विषारी कीटकाने उजव्या हाताच्या बोटाला दंश केला. त्यानंतर त्यामधून रक्तस्त्राव होऊ लागला. याबाबत त्यांनी पती ज्योतीराम यांना माहिती दिली .मुलगा राजकुमार याने त्यांना तत्काळ गावातील खासगी डॉक्टरकडे उपचारासाठी नेले. त्यानंतर कागलमध्ये एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी सलाईन लावल्यानंतर त्यांना उलटी झाल्यामुळे कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी हलवले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.