पान १०२ पटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान १०२ पटा
पान १०२ पटा

पान १०२ पटा

sakal_logo
By

मागास प्रवर्गास आरक्षणासाठी
मत मांडण्याची २१ ला संधी
कोल्हापूर : मागास प्रवर्गास आरक्षणासाठी गठीत केलेल्या समर्पित आयोगाचा शनिवारी (ता. २१) रोजी सकाळी साडेनऊ ते साडे अकरा दरम्यान भेटीचा कार्यक्रम निश्‍चित केला आहे. या वेळी मते मांडावीत आणि निवेदन द्यावीत. यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय (पुणे) येथे आपल्या नावाची नोंदणी, भेटीच्या तारखेपूर्वी करावी, असे आयोगातर्फे कळविले आहे. यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती आणि शहरातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास (ओबीसी, व्हीजे एनटी) आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे शासनाने समर्पित आयोग गठीत केला आहे. राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यात येणार आहेत.

कोतोली महाविद्यालयात प्रश्नमंजूषा स्पर्धा
पुनाळ : कोतोली (ता.पन्हाळा) येथील श्रीपतराव चौगुले आर्टस्‌ अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी येथे प्रश्नमंजूषा स्पर्धा घेतली. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व समाजशास्त्र विभागामार्फत लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्मृतिशताब्दीचे आयोजन केले होते. शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन संस्था सचिव शिवाजी पाटील यांच्या हस्ते झाले. एस. एस. कांबळे यांनी स्वागत केले. डी. एच. नाईक यांनी सूत्रसंचालन केले. प्र. प्राचार्य डॉ. श्रीमती व्ही. पी. पाटील अध्यक्षस्थानी होत्या.
स्पर्धेत प्रथम क्रमांक मयुरेश हसोळकर व शीतल पाटील यांनी पटकाविला. द्वितीय क्रमांक पूजा कराळे व सानिका बोळावे यांनी मिळवला. तृतीय क्रमांक पवन कांबळे, माधवी चौगले, विशाल सुंभ, सूरज सुतार यांनी मिळवला. तर उत्तेजनार्थ प्रशांत पाटील व ओंकार कुंभार यांनी बक्षीस मिळवले. प्रमुख उपस्थिती म्हणून अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ.बी.एन.रावण होते. पवन कांबळे यांनी आभार मानले.

म्हाळुंगे येथे क्षयरोग मुक्त ग्राम अभियान
पुनाळ : म्हाळुंगे तर्फ बोरगाव (ता. पन्हाळा) येथील ग्रामपंचायत व पडळ आरोग्य केंद्रांतर्गत क्षयरोग मुक्त अभियान राबविले. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्म शताब्दी वर्ष कृतज्ञता पर्व निमित्ताने म्हाळुंगे तर्फे बोरगाव येथे कार्यक्रम झाला. त्या संदर्भातील मोबाईल एक्स-रे व्हॅन चे उदघाटन सरपंच संग्राम पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपाली भिसे, रणजित संकपाळ, कैलास चौगुले ,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मोहनलाल कुलकर्णी, आरोग्य सहाय्यक सुनिल पवार, आरोग्य सेवक धनाजी जांभळे, आरोग्य सेविका सुष्मा चौगले, राणी महाडिक आदी उपस्थित होते.

मेघा पाटील 00967
बाळासो खाडे 00966

भावेश्वरी संस्थेत शेतकरी आघाडीची सत्ता
कसबा वाळवे ः चंद्रे (ता. राधानगरी) येथील भावेश्वरी विकास सेवा संस्थेच्या निवडणुकीत शिवराम भैरु पाटील प्रणित भावेश्वरी शेतकरी विकास आघाडीने सर्वच्या सर्व १३ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळवले. विरोधी भावेश्वरी परिवर्तन विकास आघाडीचा पराभव झाला. सहायक निबंधक शेख यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षपदी मेघा बाबासाहेब पाटील व उपाध्यक्षपदी बाळासो तुकाराम खाडे यांची निवड झाली. विजयी उमेदवार असे संग्राम पाटील, कृष्णात खाडे, आनंदा पाटील, चंद्रकांत पाटील, बाजीराव पाटील, मोहन पाटील, विश्वनाथ पाटील, आनंदा मोरे, साऊबाई पाटील, कमल बुवा, बाजीराव कांबळे. विजयी आघाडीचे नेतृत्व संग्राम शिवराम पाटील, रावसाहेब पाटील,आनंदा भाऊ मोरे,एम.डी.देसाई यांनी केले. विरोधी परिवर्तन आघाडीचे नेतृत्व प्रभाकर पाटील यांनी केले.

धान्य विभागाला आयएसओ मानांकन
माजगाव ः येथील विठ्ठल विकास सेवा संस्थेच्या धान्य विभागाला आयएसओ मानांकन प्रमाणपत्र मिळाले. प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या हस्ते धान्य विभागाचे मॅनेजर दीपक कांबळे यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारले. संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक,सभासद , कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले. यावेळी सचिव चंदर खोत, एम. डी. चौगले, रंगराव पाटील, शिवाजी चौगले आदी उपस्थित होते.

02908 -पी.एन.कांबळे
02907 बी‌.एस.फिरींगे
पन्हाळा शिक्षक संघटनेची कार्यकारिणी जाहीर
पुनाळः पन्हाळा तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची कार्यकारिणी जाहीर झाली. अध्यक्षपदी पी.एन.कांबळे, उपाध्यक्षपदी प्रा. बी. एस. फिरिंगे, प्रा. बी. आर. पाटील, सचिवपदी प्रा. जे. एस. शेटे, कार्याध्यक्षपदी समीर घोरपडे यांची निवड झाली. कार्यकारिणी अशी: सहसचिवपदी डी.एस.निकम, महिला अध्यक्षा शिल्पा पाटील, उपाध्यक्षा दीपाली मोरे-पाटील, प्रसिध्दीप्रमुख दत्तात्रय धडेल. निवडीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्रा. टी. एस. दुर्गी होते.
अन्य सदस्य असे: डॉ. संतोष जांभळे, एस. बी. बाडे, बी. व्ही. गुरवळ, शहाजी पाटील, शरद सावंत, पी. जी. पाटील, आर. बी. पाटील. या वेळी जिल्हा संघटनेचे सचिव प्रा. संजय मोरे, सहसचिव प्रा. बी. के. मडिवाल, कोषाध्यक्ष प्रा. शिवाजीराव होडगे, जिल्हा उपाध्यक्ष एन. बी. बुराण, प्रा. एन. आर. चोपडे, प्राचार्य श्री. शेख उपस्थित होते.

आजऱ्यात जलजीवनच्या कामांचा आढावा
कोल्‍हापूर :आजरा पंचायत समितीत सरपंच व ग्रामसेवक यांची आढावा बैठक घेतली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, पाणी गुणवत्ता, सार्वजनिक शौचालय, वैयक्तिक शौचालय, नळ कनेक्शन नोंदी, ग्रामपंचायत विभागाकडील सर्व विषय व इतर विषयांचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या उपस्‍थितीत घेतला. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता यांच्यासह गट विकास अधिकारी बी.डी. वाघ आदी उपस्‍थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Sgd22b00791 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top