सांगवडेवाडी ता.30 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांगवडेवाडी ता.30
सांगवडेवाडी ता.30

सांगवडेवाडी ता.30

sakal_logo
By

वसगडेत ऊस उत्पादनविषयी कार्यशाळा
सांगवडेवाडी ः महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्मामार्फत हेक्टरी १२५ टन ऊस उत्पादनविषयी वसगडे (ता. करवीर) येथील प्रगतिशील शेतकरी अजित बाबुराव सौदे यांचे शेतात झाली. अजित सौदे यांनी शेतकऱ्यांना सी.ओ. ८६०३२ जातीच्या ऊस बियाणेसाठी उपलब्ध क्षेत्राप्रमाणे रोपे तयार करण्याची पद्धत, बीज प्रक्रिया, बीज प्रक्रियेवेळी वापरायची औषधे व प्रमाण , लागण करताना दोन सरीमधील अंतर, रोपांच्या उगवणीनंतर घ्यावयाची काळजी, पाण्याचे नियोजन याविषयी माहिती दिली. कार्यक्रमात कृषी सहाय्यक स्मिता नावलगी यांनी मार्गदर्शन केले.