ऊस शेतीवर वसगडेत कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऊस शेतीवर वसगडेत कार्यशाळा
ऊस शेतीवर वसगडेत कार्यशाळा

ऊस शेतीवर वसगडेत कार्यशाळा

sakal_logo
By

ऊस शेतीवर वसगडेत कार्यशाळा
सांगवडेवाडी, ता. ९ ः महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्मातर्फे हेक्टरी १२५ टन ऊस उत्पादन याविषयी कार्यशाळी झाली. वसगडे (ता. करवीर) येथील प्रगतिशील शेतकरी अजित बाबूराव सौदे यांच्या शेतात कार्यक्रम झाला. या वेळी सौदे यांनी सी. ओ. ८६०३२ जातीच्या ऊस बियाण्यासाठी उपलब्ध क्षेत्राप्रमाणे, रोपे तयार करण्याची पद्धत, बीज प्रक्रिया, करताना वापरायची औषधे व त्याचे प्रमाण, लागण करताना दोन सरीमधील अंतर, रोपांच्या उगवणीनंतर घ्यावयाची काळजी, पाण्याचे नियोजन याविषयी माहिती दिली. कार्यक्रमात कृषी सहायक स्मिता नावलगी यांनीही मार्गदर्शन केले. या वेळी शेतकरी उपस्थित होते.