सांगवडेवाडीत जखुबाई यात्रा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांगवडेवाडीत जखुबाई यात्रा उत्साहात
सांगवडेवाडीत जखुबाई यात्रा उत्साहात

सांगवडेवाडीत जखुबाई यात्रा उत्साहात

sakal_logo
By

01066
सांगवडेवाडी : येथे जखुबाई देवीची बांधलेली आकर्षक पूजा.

01065
सांगवडेवाडी : येथेश्री नरसिंहाची पालखी बहीण जखूबाईला भेटायला आली. (छायाचित्र : प्रकाश नलवडे, सांगवडेवाडी)


‘चांगभलं’च्या जयघोशात
जखूबाई यात्रा उत्साहात
सांगवडेवाडी येथे भेटीचा सोहळा
सकाळ वृत्तसेवा
सांगवडेवाडी, ता. २४ : जखूबाईच्या नावानं चांगभलं, नरसोबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोशात ढोलांच्या निनादात सांगवडेवाडीत जखूबाई यात्रा उत्साहात झाली.
परंपरेनुसार सांगवडेवाडी येथील बहीण जखूबाईकडे ओवाळणीसाठी सांगवडे होऊन भाऊ श्री नरसिंहाची पालखी सांगवडेवाडीत आली. येथे जखूबाई मंदिरात ओवाळणी, मानपान करून परत सांगवडेकडे रवाना झाली. पालखी मार्गावर बाबासाहेब खोत यांनी पायघड्या घातल्या. तत्पूर्वी सकाळी जखूबाईची उत्सव मूर्ती खोत गल्लीतून सत्यापा खोत यांच्या घरातून हंस खोत यांच्या घरी ओटी भरून शेतातील जखूबाई मंदिरात ढोलांच्या निनादात आणण्यात आली. मंदिरात नारायण गुरव, महेश गुरव यांनी चंद्रावरील आकर्षक पूजा बांधली. विशाल जोशी यांनी जखूबाईला नरसिंहाचे वतीने ओवाळीनंतर साडीचोळी दिली. दिनकर नेरलेकर यांनी डोक्यावर उत्सव मूर्ती घेतली होती. महिलांनी रांगोळ्या रेखाटून स्वागत केले. उत्सवमूर्ती परत गावाकडे येताना देशपांडे परिवारातर्फे ओटी भरण्यात आली. दुपारी बारा ते तीनपर्यंत प्राथमिक शाळेच्या आवारात लावण्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला हजारो लोकांनी गर्दी केली होती. आकर्षक सजवलेल्या बैलजोड्या सांगवडे, सांगवडेवाडीतील शेतकऱ्यांनी मिरवणुकीत आणल्या होत्या. जखूबाई यात्रा कमिटी व ग्रामपंचायतीने मंदिरात व गावात स्वच्छता ठेवून उत्कृष्ट नियोजन केले होते. श्री नरसिंह देव देवस्थानचे ट्रस्टी, सेवेकरी, मानकरी, सांगवडे, सांगवडेवाडीतील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. पाळणे, खेळणी, खाद्यपदार्थांची दुकाने शिस्तबद्ध लावण्यात आली होती. कोरोनानंतर पहिल्यांदाच यात्रा भरल्याने लोकांनी गर्दी केली होती. गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश माने यांच्या मार्गदर्शनाने पोलिस बंदोबस्त ठेवला होता. मंगळवार रात्री नऊ वाजता ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे.