सांगवडेवाडी ता. 25

सांगवडेवाडी ता. 25

श्रमसंस्कार’मधील अनुभव म्हणजे
सहजिवनाचा अविष्कारः डॉ. वनमोरे

सांगवडेवाडी, ता.२५ ः श्रम संस्कार शिबीरामध्ये सर्व प्रकारच्या मुलांचा सहवास लाभल्याने चर्चेतून मनातील राक्षसी विचार लोप पावून चांगल्या विचारांची बैठक तयार होते. स्वयंम शिस्त व आपल्यातील सुक्त कला गुणांना चालना मिळते. त्यामुळे श्रम संस्कार शिबीरातील अनुभव म्हणजे सहजिवनाचा अविष्कार ठरतो असे मत शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनाचे माजी संचालक डॉ . एच.एच.वनमोरे यांनी व्यक्त केले. वसगडे (ता. करवीर) येथे स्वामी विवेकानंद कॉलेजच्या श्रमसंस्कार शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. चंद्रशेखर दोडमणी, वैशाली गवळी यांनी मार्गदर्शन केले. सौरभ जाधव, संदीप पाटील, साक्षी दुबे या विद्यार्थ्यांनी शिबीरामधील अनुभव सांगितले.
राष्ट्रीय सेवा योजना महाराष्ट्र राज्याची सदिच्छादूत प्रिया पाटील, सरपंच योगिता बागडी, सदस्या वैशाली गवळी, करिष्मा कांबळे, सुदर्शन सोनवणे, डॉ. श्रीकांत चौगुले, प्रदीप येवारे, बाळासो उपाध्ये, कृषीभूषण अजित सौदे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. संदीप पाटील, प्रा. डॉ. बी. के. दांगट, प्रा.डी .के. गावित, प्रा. एम. एस. देशपांडे, शिबीरार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते
प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा.पी.आर. बागडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ. राजश्री पाटील यांनी केले. आभार प्रा.तिजाईकर यांनी मानले

फोटो ओळी..... वसगडे येथे श्रम संस्कार शिबिर समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. वनमोरे व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com