वसगडे येथे सोमवारीपासून भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसगडे येथे सोमवारीपासून
भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव
वसगडे येथे सोमवारीपासून भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव

वसगडे येथे सोमवारीपासून भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव

sakal_logo
By

वसगडे येथे भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव
सांगवडेवाडी, ता. २८ : श्री पार्श्‍वनाथ वनविहार तपोवन वसगडे (ता. करवीर) येथे श्री १०८ भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सवाचे सोमवारी ३ एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता आयोजन केले आहे. या निमित्ताने ४ एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवारी (ता. ३१) धावणे, संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा होणार आहेत. शनिवारी (ता. १) मोठा गट रांगोळी स्पर्धा, मुली लहान गट व महिला मोठा गट संगीत खुर्ची स्पर्धा, लिंबू चमचा स्पर्धा होणार असून रविवारी (ता. २) गाव मर्यादित जातिवंत जनावरांचे प्रदर्शन व स्पर्धा होणार आहेत. सायंकाळी गुणगौरव सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सोमवारी (ता. ३) सकाळी ध्वजारोहण व अहिंसा रॅली दुपारी ३ वाजता पालखी मिरवणूक व मंगळवारी (ता. ४) सायंकाळी 6 वाजता रथोत्सव होणार आहे, अशी माहिती दिगंबर जैन समाज, वीर महिला मंडळ व वीर सेवा दल यांच्यातर्फे देण्यात आली आहे.