वसगडेत योजनाच्या प्रचार प्रसिध्दी कार्यक्रम

वसगडेत योजनाच्या प्रचार प्रसिध्दी कार्यक्रम

सामाजिकन्याय पर्व अंतर्गत
वसगडेत योजनाची प्रचार
सांगवडेवाडी, ता. २७ ः सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त आठ दिवस विविध उपक्रम सुरू आहेत त्यातीलच एक उपक्रम सामाजिक न्याय पर्वाचे आयोजन वसगडे (ता. करवीर) करण्यात आले होता.
या वेळी समाज कल्याण विभागाच्या योजना प्रचार प्रसिद्धी कार्यक्रम घेण्यात आला. समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. या वेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, वसतिगृह योजना, निवासी शाळा, आश्रमशाळा, विविध शिष्यवृत्ती योजना, मिनी ट्रॅक्टर योजना, विविध महामंडळे, बार्टीच्या योजना, रमाई आवास योजना, ॲट्रॉसिटी योजना, परदेशी स्कॉलरशिप योजना अशा अनेक योजनांची माहिती देण्यात आली. या वेळी १५० ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सरपंच योगिता बागडी, आशा रावण, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शीतल कांबळे, आनंदा कांबळे, जयंती कमिटी वसगडे सदस्य, अध्यक्ष संतोष कांबळे उपस्थित होते. अशोक साळुंके यांनी सूत्रसंचालन केले. गौतम कांबळे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी आयुक्त लोंढे यांचे स्वागत किशोर फाळके यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com