सांगवडेवाडी ता.28 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांगवडेवाडी ता.28
सांगवडेवाडी ता.28

सांगवडेवाडी ता.28

sakal_logo
By

01229

सांगवडेवाडीत जकुबाईची हेडगी जत्रा
सांगवडेवाडी; ता. २८ ः ‘जकूबाईच्या नावानं चांगभलं..’च्या गजरात ढोलांच्या निनादात सांगवडेवाडी (ता. करवीर) येथील ग्रामदैवत असलेल्या जकुबाई देवीची हेडगी यात्रा आज उत्साहात झाली.
सकाळी उत्सव मूर्ती गावातील खोत गल्लीतील सत्याप्पा खोत यांच्या घरातून सजवून हंस बाबासाहेब खोत यांच्या घरी ओटी भरून संजय सिद्धनुरले यांनी मूर्ती डोक्यावरून वाजत गाजत शेतातील मंदिरात नेली.
यावेळी मार्गावर दुतर्फा सुहासिनीनी रांगोळ्या आणि आरती ओवाळून स्वागत केले. मंदिरातील पूजा व धार्मिक विधी नारायण गुरव, तेजस गुरव यांनी केला. मंदिर परिसर आकर्षक विद्युतरोषणाई, पानाफुलांनी सजून गेला होता. दुपारी एक वाजता परंपरेनुसार चर शिंपडून आरती होऊन महाप्रसादाला सुरवात झाली. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महिला शेतातील निसर्गरम्य प्राचीन मंदिरात पुरणपोळीचा नैवेद्य डोक्यावर बुट्टी घेऊन येतात. कन्नडमध्ये हेडगी तर मराठीत बुट्टी म्हणतात. या बुट्टीमध्ये नैवेद्य घेऊन महिला येतात, म्हणून जकूबाईची हेडगी यात्रा म्हणतात. यावेळी माहेरवाशींनी देवीची ओटी भरली. सायंकाळी उत्सव मूर्ती मंदिरातून वाजतगाजत पुन्हा खोत गल्लीत आली. यात्रा कमिटी व ग्रामपंचायतीने उत्कृष्ट नियोजन केले. मंदिर परिसरात पूजासाहित्य, मेवामिठाई व खेळण्यांच्या दुकानांनी गर्दी केली होती.