
राज्यस्तरीय मेळावा
03505
कागलमध्ये महात्मा बसवेश्वर जयंती
कागल : महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची जल्लोषी मिरवणूक काढली. येथील बस स्थानकाजवळ मिरवणुकीची सुरुवात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पूजनाने झाली. मंत्री श्री. मुश्रीफ यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय चितारी, माजी उपनगराध्यक्ष सुनील माळी, राजू पाटील, सुनील माळी, संजय ठाणेकर, अमित पिष्टे, बाबूराव पुंडे, योगेश गाताडे, प्रकाश माळी, सनी जकाते, प्रकाश पाटील, प्रकाश माळी आदी उपस्थित होते.
2269
घोटवडेत वंचित शेतकरी संघटनेची शाखा
माजगाव ः घोटवडे (ता. पन्हाळा) येथे वंचित शेतकरी संघटनेच्या ७५ व्या शाखेचे उद्घाटन झाले. यानिमित्त शेतकरी मेळावा झाला. संघटनाप्रमुख प्रा. बाजीराव पाटील व जिल्हाध्यक्ष उदयसिंह पाटील व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्टघाटन झाले. प्रा. पाटील यांनी सर्व घटकांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध राहू, असे प्रतिपादन केले. राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा, करवीर तालुक्यातील आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा सत्कार झाला.
सर्जेराव पाटील सेवा संस्था बिनविरोध
पोर्ले तर्फ ठाणे ः पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील कासारी समूहाचे नेते व माजी जि. प. सदस्य प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखालील सर्जेराव पाटील हनुमान विकास सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. पी. मटिरमणी होते. बिनविरोध संचालक असे ः प्रकाश पाटील, पांडुरंग पाटील, महादेव चौगुले, सरदार पाटील, भीमराव साळोखे, आनंदा शेवाळे, स्वरुप पाटील, हिंदूराव खवरे, प्रकाश आ. पाटील, नारायण काशीद, नारायण चेचर, रामराव चेचर, उमेश जाधव, सुधीर संकपाळ, खानू धनगर, पुष्पा चौगुले, चिंगुबाई उबाळे.
02933
सुभाष पाटील अध्यक्षपदी
राशिवडे बुद्रुक ः येथील यशवंत विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी सुभाष विनायक पाटील व उपाध्यक्षपदी नामदेव यशवंत गोंगाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीच्या अध्यक्षस्थानी स्वप्नील आगम होते. बिनविरोध संचालक असे : डॉ. जालंदर पाटील, सागर मगदूम, रंगराव लाड, राजाराम चौगले, शशिकांत पाटील, यशवंत पाटील, महादेव गोनुगडे, सौ. दीपा पाटील, सौ. शकुंतला पाटील, सुर्याप्पा जोंग, दिनकर कांबळे. जालंदर पाटील व सदाशिव ढोणे यांनी मनोगत व्यक्त केले. सी. डी. पाटील, जयवंत पाटील, जयवंत मगदूम, जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील, सचिव भिकाजी यादव उपस्थित होते. स्वागत राजेंद्र पाटील यांनी केले. आभार रमेश पाटील यांनी मानले.
02564
नेर्ली ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा विमा
सांगवडेवाडी ः महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ग्रामपंचायत नेर्ली विकासवाडीचे लोकनियुक्त सरपंच, गोकुळ दूध संघाचे संचालक प्रकाश पाटील यांनी स्वखर्चातून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा आरोग्य व अपघात विमा करून सामाजिक बांधिलकी जपली. जनार्दन पाटील, कृष्णात पाटील, राहुल पाटील, अंकुश पुजारी, प्रदीप ढाले, रायगोंडा पुजारी, प्रदीप चौगुले, नितीन संकपाळ, यशवंत दिवटे उपस्थित होते.
02931
02932
धनाजी पाटील अध्यक्षपदी
राशिवडे बुद्रुक ः कोदवडे (ता. राधानगरी) येथील शिवशंभो विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी धनाजी भिवा पाटील व उपाध्यपदी शिवाजी गोपाळ भाट यांची बिनविरोध निवड झाली. निवड बैठकीच्या अध्यक्षस्थानी निवडणूक अधिकारी सागर रानमाळे होते. संचालक असे : आंनदा लक्ष्मण पाटील, गणपती कृष्णा पाटील( येळवडे) एकनाथ तुकाराम पाटील, प्रशांत संभाजी पाटील, शिवाजी बापु देवळकर, कृष्णात बाळू पाटील, किरण तानाजी पाटील, तानाजी गंगाराम कांबळे, राजश्री बाळासो पाटील, सुनीता कृष्णात पाटील.
दशनाम गोसावी समाजाचा रविवारी मेळावा
शाहूनगर ः जिल्हा दशनाम गोसावी समाज संस्थेच्यावतीने दशनाम गोसावी समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ रविवारी (ता. २९) सकाळी दहा वाजता कोल्हापूर येथील दैवज्ञ बोर्डिंगमध्ये होणार आहे. ही माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णात बुवा कौलवकर यांनी दिली. श्री. बुवा म्हणाले, ‘‘संघटनेच्या वतीने समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. वधू-वर मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या निमित्ताने समाजबांधव एकत्र येणार आहेत. वधू-वर मेळाव्यासाठी इच्छुकांनी संस्थेशी संपर्क साधावा.’’
००७२५, ००७२४
पांडुरंग गायकवाड अध्यक्षपदी
सातवे : आरळे (ता. पन्हाळा) येथील श्रीराम विकास सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी पांडुरंग संपतराव गायकवाड यांची तर उपाध्यक्षपदी आनंदा मारुती पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवड समितीच्या अध्यक्षस्थानी आय. सी. देसाई होते. सदस्य शिवाजीराव गायकवाड, राजेंद्र पाटील, शंकर पोवार, लक्ष्मण डवंग, सागर देशमुख, मारुती रणशिंग, राजाराम महापुरे, सुवर्णा गायकवाड, बाळाबाई घाटगे, संस्थापक रामचंद्र गायकवाड, मार्गदर्शक आरळेचे सरपंच संतोष गायकवाड उपस्थित होते. स्वागत क्लार्क शिवाजी घाटगे तर आभार सचिव प्रकाश खाडे यांनी मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Shu22b02672 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..