राज्यस्तरीय मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यस्तरीय मेळावा
राज्यस्तरीय मेळावा

राज्यस्तरीय मेळावा

sakal_logo
By

02933
सुभाष पाटील अध्यक्षपदी
राशिवडे बुद्रुक ः येथील यशवंत विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी सुभाष विनायक पाटील व उपाध्यक्षपदी नामदेव यशवंत गोंगाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीच्या अध्यक्षस्थानी स्वप्नील आगम होते. बिनविरोध संचालक असे : डॉ. जालंदर पाटील, सागर मगदूम, रंगराव लाड, राजाराम चौगले, शशिकांत पाटील, यशवंत पाटील, महादेव गोनुगडे, सौ. दीपा पाटील, सौ. शकुंतला पाटील, सुर्याप्पा जोंग, दिनकर कांबळे. जालंदर पाटील व सदाशिव ढोणे यांनी मनोगत व्यक्त केले. सी. डी. पाटील, जयवंत पाटील, जयवंत मगदूम, जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील, सचिव भिकाजी यादव उपस्थित होते. स्वागत राजेंद्र पाटील यांनी केले. आभार रमेश पाटील यांनी मानले.


२२८५
सालपेवाडी सरपंचपदी उज्वला पाटील
गारगोटी : सालपेवाडी (ता. भुदरगड) येथील सरपंचपदी उज्वला संभाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायतीवर भाजप-राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडीची सत्ता आहे. सरपंच पाटील युवक नेते राहुल देसाई गटाच्या कार्यकर्त्या आहेत. मावळत्या सरपंच काजल शिंदे यांना राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी निवड सभा झाली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात नूतन सरपंचांची मिरवणूक काढली. सरपंच उज्वला पाटील, मावळत्या सरपंच काजल शिंदे, माजी सरपंच एच. डी. देसाई, भगवान शिंदे, यशवंत मुळिक, शिवाजी मुळिक, सागर देसाई, एस. पी. पाटील, अशोक गोरे आदींनी मनोगत व्यक्त केले. पोलिसपाटील स्वाती देसाई, राजू शिंदे, संग्राम शिंदे, संभाजी पाटील, बाबूराव चव्हाण, हिंदुराव चव्हाण, दिलीप आडसूळे, दत्ता पाटील, प्रणील देसाई, उत्तम देसाई, निवृत्ती शिंदे, सदाशिव मुळीक, चेतन शिंदे, संग्राम शिंदे, मंगल झोरे, अमोल झोरे, सुवर्णा देसाई, रेखा देसाई, लक्ष्मीबाई मोरबाळे, जिजाबाई मोरबाळे, लता शिंदे, कल्पना शिंदे, सरिता मुळीक आदि उपस्थित होते. नामदेव झोरे यांनी आभार मानले.

मुदाळ येथे मुख्याध्यापकांची सहविचार सभा
गारगोटी : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दी कृतज्ञता महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी व शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या शैक्षणिक नियोजनासाठी मुदाळ येथील प. बा. पाटील माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापकांची सहविचार सभा झाली. शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर अध्यक्षस्थानी होते. श्री. आंबोकर यांनी कृतज्ञता पर्वानिमित्ताने घेण्यात येणाऱ्या विज्ञान प्रदर्शन, कथाकथन स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, तसेच ग्रंथप्रदर्शन यासंदर्भात माहिती दिली. शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा, एनटीएस, एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. उपशिक्षणाधिकारी गजानन उकिर्डे यांनी प्रास्ताविक केले. गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, उपशिक्षणाधिकारी एस. बी. मानकर, मुख्याध्यापक एम. बी. पाटील, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ, उपाध्यक्ष मिलिंद पांगिरेकर, मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष बी. आर. बुगडे, प्राचार्य एस. आर. पाटील, एन. बी. पाटील यांच्यासह मुख्याध्यापक उपस्थित होते.

02931
02932
धनाजी पाटील अध्यक्षपदी
राशिवडे बुद्रुक ः कोदवडे (ता. राधानगरी) येथील शिवशंभो विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी धनाजी भिवा पाटील व उपाध्यपदी शिवाजी गोपाळ भाट यांची बिनविरोध निवड झाली. निवड बैठकीच्या अध्यक्षस्थानी निवडणूक अधिकारी सागर रानमाळे होते. संचालक असे : आंनदा लक्ष्मण पाटील, गणपती कृष्णा पाटील( येळवडे) एकनाथ तुकाराम पाटील, प्रशांत संभाजी पाटील, शिवाजी बापु देवळकर, कृष्णात बाळू पाटील, किरण तानाजी पाटील, तानाजी गंगाराम कांबळे, राजश्री बाळासो पाटील, सुनीता कृष्णात पाटील.

००७२५, ००७२४
पांडुरंग गायकवाड अध्यक्षपदी
सातवे : आरळे (ता. पन्हाळा) येथील श्रीराम विकास सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी पांडुरंग संपतराव गायकवाड यांची तर उपाध्यक्षपदी आनंदा मारुती पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवड समितीच्या अध्यक्षस्थानी आय. सी. देसाई होते. सदस्य शिवाजीराव गायकवाड, राजेंद्र पाटील, शंकर पोवार, लक्ष्मण डवंग, सागर देशमुख, मारुती रणशिंग, राजाराम महापुरे, सुवर्णा गायकवाड, बाळाबाई घाटगे, संस्थापक रामचंद्र गायकवाड, मार्गदर्शक आरळेचे सरपंच संतोष गायकवाड उपस्थित होते. स्वागत क्लार्क शिवाजी घाटगे तर आभार सचिव प्रकाश खाडे यांनी मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Shu22b02672 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top