पान ७ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ७
पान ७

पान ७

sakal_logo
By

आमदार पाटील यांचे पत्रिकेत
नाव नसल्याबद्दल भाजपतर्फे निषेध

शाहूनगर ः राधानगरी धरणस्थळाजवळ रविवारी (ता.१५) रोजी होणाऱ्या शाहू स्मृती केंद्राच्या उद्‍घाटन समारंभाच्या निमंत्रण पत्रिकेत आमदार चंद्रकांत पाटील यांचे नाव न घातल्याबद्दल राधानगरी तालुका भारतीय जनता पक्षातर्फे संयोजकांचा व स्मारक समितीचा निषेध केला आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निषेधाचे पत्रक प्रसिद्धीस दिले. पत्रकात म्हटले आहे, २०१७-१८ ला तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शाहू स्मृतीकेंद्राला जिल्हा नियोजन मंडळातून ५० लाखांचा भरीव निधी दिला होता. या केंद्राच्या जागेच्या समस्यांसह तांत्रिक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला होता. असे असताना श्री. पाटील यांना उद्‍घाटन सोहळ्याचे निमंत्रण दिले नाही व पत्रिकेत नावही छापले नाही. ही खेदाची बाब आहे. शाहू राजांच्या स्मृतीकेंद्राचा उद्‍घाटन कार्यक्रम एका गटापुरता मर्यादित ठेवला आहे.
पत्रकावर भाजपचे जिल्हा चिटणीस डॉ. सुभाष जाधव, संतोष कातिवले, दीपक पाटील, सुनील लिंगडे, मीनाक्षी नकाते, पोपट जमादार, शिवाजी महाडिक, शहाजी मोगणे, धोंडिराम देवळकर यांच्या सह्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Shu22b02701 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top