
चाैकशीची मागणी निवेदन
पुलाच्या कामाची चौकशी करा
शाहूनगर ः राधानगरी तालुक्यातील कौलवपैकी भोपळवाडी येथे नव्याने बांधलेला पुल चुकीच्या ठिकाणी बांधला असून सदर कामाची चौकशी करावी अशी मागणी भोपळवाडी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. भोपळवाडी ते पिंपळवाडी रस्त्याशेजारील गट नंबर 107 मध्ये शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत साकववजा पुलाचे बांधकाम केले आहे. या ठिकाणी पुलाची कोणतीही गरज नसताना हे बांधकाम झालेले असून त्यामुळे शासनाचे पैसे वाया गेले आहेत .हा पुल कोणत्या निधीतून बांधला आहे याची माहिती संबंधितांनी द्यावी.निवेदनावर विलास भोपळे, ज्ञानदेव भोपळे शरद भोपळे, अमित पवार, विजय भोपळे, सागर भोपळे आदींच्या सह्या आहेत. दरम्यान कौलव ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.सदरचे काम चुकीच्या पध्दतीने झाले असल्यास त्याची चौकशी करणार असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Shu22b02752 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..