Mon, Feb 6, 2023

बांधावरून पडून शेतकऱ्याचा मृत्यू सोबत फोटो
बांधावरून पडून शेतकऱ्याचा मृत्यू सोबत फोटो
Published on : 25 November 2022, 6:20 am
2907
बांधावरून पडून शेतकऱ्याचा मृत्यू
शाहूनगर ः कौलव (ता. राधानगरी) येथील हिंदुराव दौलू चरापले (वय ७०) या शेतकऱ्याचा शेताच्या बांधावरून पडून मृत्यू झाला. हिंदुराव चरापले शुक्रवारी सकाळी जनावरांना वैरण आणण्यासाठी शेतात गेले होते. वैरणीचा भारा डोक्यावर घेऊन येत असताना बांधावरून त्यांचा पाय घसरला व ते खाली पडले. मानेवर भारा पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. भोगावती साखर कारखान्याचे ते सेवानिवृत्त कर्मचारी होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.