युवा संमेलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युवा संमेलन
युवा संमेलन

युवा संमेलन

sakal_logo
By

भोगावती महाविद्यालयात मंगळवारी
बलशाली युवा हृदय संमेलन

शाहूनगरः शिवम प्रतिष्ठान, भोगावती परिसर व भोगावती महाविद्यालय यांच्यावतीने कुरुकली (ता. करवीर) येथील भोगावती महाविद्यालयात मंगळवारी (ता. २७) माजी सनदी अधिकारी, शिवम प्रतिष्ठानचे प्रमुख इंद्रजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय बलशाली युवा हृदय संमेलन होणार आहे. संमेलनाच्या पहिल्या सत्रात सकाळी नऊ वाजता राधानगरीचे पोलिस निरीक्षक श्रीपाद यादव यांच्या हस्ते व भोगावती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयसिंगराव हुजरे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचे उद्‌घाटन होईल. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, प्राचार्य डॉ. डी. ए. चौगले प्रमुख उपस्थित असतील. दुसऱ्या सत्रात अभय भंडारी यांचे ‘मनुष्याचे राष्ट्रीय चारित्र्य आणि समाज’ या विषयावर व्याख्यान होईल. राधानगरीच्या पोलिस उपनिरीक्षक अनुराधा पाटील अध्यक्षस्थानी असतील. तिसऱ्या सत्रात ‘राष्ट्राच्या जडणघडणीत युवकांची भूमिका’ या विषयावर प्रा. डॉ. जालंदर पाटील यांचे व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी प्रवीण दाभोळे असतील. चौथ्या सत्रात इंद्रजित देशमुख यांचे ‘आनंदाचे आवारू मांडू जगा’ या विषयावर व्याख्यान होईल. के. द. पाटील अध्यक्षस्थानी असतील. संमेलनाला युवकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. पवन पाटील यांनी केले आहे.