वक्तृत्व स्पर्धा निकाल सोबत फोटो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वक्तृत्व स्पर्धा  निकाल सोबत फोटो
वक्तृत्व स्पर्धा निकाल सोबत फोटो

वक्तृत्व स्पर्धा निकाल सोबत फोटो

sakal_logo
By

B02962
कुरुकली : वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यासोबत धैर्यशील पाटील, प्राचार्य डॉ. चौगले, उपप्रचार्य हंकारे, प्रा. साळाेखे व इतर.

शाहूनगर ता. २६ ः भोगावती कारखान्याचे संस्थापक कै. दादासाहेब पाटील-कौलवकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त भोगावती शिक्षण प्रसारक मंडळातर्फे कुरुकली (ता. करवीर) येथील भाेगावती महाविद्यालयात झालेल्या खुल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत गणेश लोळगे व सिद्धेश मिसाळ यांनी प्रथम क्रमांक मिळवला. स्पर्धेत २७ स्पर्धक सहभागी झाले होते. विशाल ठाकूर व श्रेया सावंत यांनी द्वितीय, वेदिका पाटील व ऋतुजा पवार यांनी तृतीय क्रमांक मिळवला. अनुष्का पाटील, चैतन्य कांबळे, विधीरा विभूते यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. उद्घाटन भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील-कौलवकर यांच्या हस्ते व संस्थाध्यक्ष जयसिंगराव हुजरे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, संचालक बंडाेपंत वाडकर, पी. बी. कवडे, बबनराव पाटील, उपप्राचार्य डॉ. एन. एम. पाटील, डॉ. डी. एन. पाटील, पी. एस. पाटील, शहाजी पाटील, उपप्राचार्य आर. बी. हंकारे, प्रा. अनिल पाटील, प्रा. संदीप चाैगले, प्रा. वैशाली गुंजेकर, अभिजित मेटील उपस्थित होते. प्राचार्य डॉ. डी. ए. चौगले यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. टी. एम. चौगले, प्रा. डॉ. सविता व्हटकर, प्रा. व्ही. एम. पाटील, प्रा. किरण पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. प्रा. डॉ. संजय साळाेखे यांनी आभार मानले. प्रा. पवन पाटील यांनी सूत्रसंचालन केले.