
शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू सोबत फोटो
०२९६८
बेलेत शेतकऱ्याचा हाेरपळून मृत्यू
शाहूनगर : बेले (ता. करवीर) येथे शेतातील उसाचा पाला पेटवताना लागलेल्या आगीत शेतकऱ्याचा हाेरपळुन मृत्यू झाला. पांडुरंग भाऊ पाटील (वय ८०)असे शेतकऱ्याचे नाव आहे. याची माहिती अशी, पांडुरंग पाटील शेतात सायंकाळी ताेड झालेल्या उसाचा पाला पेटविण्यासाठी गेले होते. चारी बाजुनी पाला पेटवल्यामुळे आगीने उग्ररूप धारण केले. शेजारील शेतात मेंढपाळांनी मेंढरे बसवली होती. आग तिकडे जाऊ नये म्हणून त्यांनी पाल्यामध्ये जाऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात ते जखमी झाले. त्यांना नागरिकांनी उपचारासाठी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या मागे दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अपघाताची नाेंद करवीर पोलीस ठाण्यात झाली.