पारिताेषिक वितरण साेबत फाेटाे. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पारिताेषिक वितरण साेबत फाेटाे.
पारिताेषिक वितरण साेबत फाेटाे.

पारिताेषिक वितरण साेबत फाेटाे.

sakal_logo
By

03058
शिवराज विद्यालयात स्नेहसंमेलन
शाहूनगर ः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे बुद्धिमत्ता आहे. शिक्षक, पालकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्यास शैक्षणिक क्रांती होईल, असे प्रतिपादन भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले यांनी केले. कौलव (ता. राधानगरी) येथील शिवराज विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष जी. बी. चरापले होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना राजेंद्रकुमार भोसले, सदाशिवराव चरापले यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. चिमुकल्यांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला. यावेळी रणजीत पाटील, संदीप चरापले, ओमकार चरापले, प्रतीक चरापले, बाळ खडके, दीपक चरापले, विजय पाटील, सतीश चरापले, राजाराम जाधव, बी. आर. चरापले, दत्तात्रय पाटील, पांडुरंग पाटील उपस्थित होते. मुख्याध्यापक शरद कांबळे यांनी प्रास्ताविक केले. सुनीता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रतीक चरापले यांनी आभार मानले.