Sun, May 28, 2023

घोटवडे येथे महाशिवरात्री उत्साहात
घोटवडे येथे महाशिवरात्री उत्साहात
Published on : 19 February 2023, 3:46 am
घोटवडे येथे महाशिवरात्री उत्साहात
शाहूनगर ः घोटवडे (ता. राधानगरी) येथील प्राचीन श्री स्वयंभू मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त शनिवारी (ता. १८) भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. येथे प्रतिवर्षी महाशिवरात्रीला महाराष्ट्रासह कर्नाटकातून भाविक येतात. शनिवारी सकाळी महाअभिषेक, पूजा, ओम नमः शिवाय मंत्र जप, बेल वाहणे, आरती, सामुदायिक श्री शिवलीलामृत ग्रंथ पारायण, भजन आदी धार्मिक कार्यक्रम झाले. दर्शनासाठी भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलला होता. मंदिर परिसरात खेळणी व खाद्यांचे स्टॉल सजले होते. रविवारी (ता. १९) महाप्रसाद वाटप आहे.