
महिला दिन कार्यक्रम साेबत फाेटाे
03104
परितेत विविध कार्यक्रम
शाहूनगर : परिते (ता. करवीर) येथे ग्रामपंचायतीतर्फे विविध कार्यक्रम झाले. पहिल्या सत्रात महिला व बालकल्याण विभागाचे संरक्षण अधिकारी विनायक चौगले यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले. हास्यसम्राट संभाजी यादव यांनी अंधश्रद्धा, रूढी-परंपरेबाबत प्रबोधन केले. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड वाटपही झाले. प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातर्फे हिमोग्लोबीन तपासणी शिबिर झाले. दुसऱ्या सत्रात महिला बचत गट, व्यावसायिक व खवय्यांसाठी खाद्यमहोत्सव, प्रश्नमंजूषा झाली. सरपंच मनाेज पाटील यांनी स्वागत व दीपाली पाटील यांनी प्रास्ताविक केले. उपसरपंच आशिताेष पाटील, सदस्या शारदा पाटील, वंदना गुरव, विद्या पाटील, उज्वला पाटील, सुभाष पोवार, शहाजी पवते, जयवंत नेमाने, अजित पाटील, सुभाष जाधव, कांचन पाटील, आक्काताई पाटील, स्वाती पवते, विलास पाटील, अश्र्विनी पाटील, शिवाजी मेढे, मुख्याध्यापक श्रीकांत गुर्जर, राजेश पाटील, जनार्दन पाटील, जानकू पाटील, ज्ञानदेव भुईंगडे उपस्थित होते.