पान ७ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ७
पान ७

पान ७

sakal_logo
By

02224
शाहूनगर ः परिते-ठिकपुर्ली फाटा रस्‍त्यावर झालेली वाहतूक कोंडी.

ठिकपुर्ली फाट्यावर वाहतूक कोंडी
शाहूनगर ः कोल्हापूर-राधानगरी रस्त्यावरील परिते ते ठिकपुर्ली फाटा येथील रस्ता दुरुस्तीचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असून हे काम त्वरित पूर्ण करावे; अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे. कोल्हापूर ते परिते व परिते ते गारगोटी मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सध्या सुरू आहेत. त्यामध्ये परिते बसस्थानक ते ठिकपुर्ली फाटा या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम काही दिवस सुरू असून त्यामुळे येथे एकेरी मार्गाने वाहतूक सुरू आहे. परिणामी वाहतुकीची कोंडी होत आहे. या ठिकाणाहूनच कोल्हापूर-राधानगरी मार्ग गेल्यामुळे रस्त्यावर दररोज हजारो वाहने ये-जा करीत असतात. मात्र एकेरी वाहतुकीमुळे दररोज वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन वाहनधारकांना त्याचा त्रास होत आहे, म्हणून रस्त्याचे सुरू असलेले काम गतीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.