
बैठक साेबत फाेटाे
03151
समविचारींना घेऊन
‘भोगावती’ लढविणार
धैर्यशील पाटील; घोटवडेत राष्टवादीचा मेळावा
शाहूनगर ता. २२ : भोगावती साखर कारखान्याला गतवैभव देण्यासाठी संस्थापक कै. दादासाहेब पाटील-काैलवकर यांच्या विचाराने समविचारी मंडळींना सोबत घेऊन कारखान्याची निवडणूक लढवणार आहाेत, असे भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील-कौलवकर यांनी सांगितले. घोटवडे (ता. राधानगरी) येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पी. वाय. कातिवले होते. श्री. पाटील म्हणाले, ‘आमच्या काळात सहकार क्षेत्रात अग्रेसर असणारा कारखाना आर्थिक अडचणीत आहे. त्याचा फटका सभासद, कामगार, ऊसतोडणी ओढणी कंत्राटदारांना बसला आहे. म्हणूनच कारखान्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी सभासदांनी पाठीशी उभा राहावे. भोगावती शिक्षण मंडळाची निवडणूकही लढवणार असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वांनी सत्तारुढ राजर्षी शाहू विकास आघाडीला साथ द्यावी.’ मयूर डोंगळे यांनी स्वागत केले. सर्जेराव पाटील, सतीश डोंगळे, आनंदराव पाटील, प्रा. कृष्णात भाटले, शहाजी पाटील, सुहास डोंगळे यांची भाषणे झाली. यावेळी संजय डोंगळे, पप्पूकाका कुलकर्णी, शिवाजी पाटील, आणाप्पा बरगे, अशोक भोपळे, शिवाजी बरगे, बाबूराव पाटील,चंद्रकांत डोंगळे, विकास डोंगळे, संदीप टिपुगडे उपस्थित होते.