
रक्तदान शिबीर साेबत फाेटाे
03163
देवाळेतील शिबिरात
शंभरावर दात्यांचे रक्तदान
शाहूनगर ः देवाळे (ता. करवीर) येथील कै. मीनाताई पाटील पुण्यतिथीनिमित्त संजीवनी ब्लड बँकेच्यावतीने रक्तदान शिबिर व नेत्रतपासणी शिबिर
झाले. त्यामध्ये १०२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. ६० रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली. कुंभी कारखान्याचे अध्यक्ष चंद्रदीप नरके यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी श्री. नरके म्हणाले, ‘रक्तदान शिबिरातून पाटील कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी क्रांतिसिंह पवार-पाटील, भोगावती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष हंबीरराव पाटील, प्रा. शिवाजीराव पाटील, प्रा. डॉ. एन. एम. पाटील, विकास पाटील, सुशांत पाटील, सदाशिव पाटील, तानाजी पाटील, उत्तम पाटील, मधुकर पाटील, प्रताप पाटील, जयवंत पाटील, बळवंत पाटील, राजू नाईक, संदीप दळवी, करण पाटील, विशाल पाटील उपस्थित होते. आधार व मतदार नोंदणी उपक्रमही राबविण्यात आला.