वार्षिक पारितोषिक वितरण सोबत फोटो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वार्षिक पारितोषिक वितरण सोबत फोटो
वार्षिक पारितोषिक वितरण सोबत फोटो

वार्षिक पारितोषिक वितरण सोबत फोटो

sakal_logo
By

03169
कुरुकलीत गुणवंतांचा सत्कार
शाहूनगर ः विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त करण्याबरोबरच क्रीडा क्षेत्रामध्येही कर्तृत्वाचा ठसा उमटवावा, असे आवाहन भारतीय खो-खो संघाचे माजी कर्णधार बाळासाहेब पोकार्डे यांनी केले. कुरुकली (ता. करवीर) येथील भोगावती महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरणावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील होते. स्पर्धांतील यशस्वी खेळाडूंना पारितोषिके देण्यात आली. गुणवंत विद्यार्थी व प्राध्यापकांचा सत्कार झाला. सर्जेराव पाटील, बबनराव पाटील, दीपक पाटील, दिव्या पाटील यांची भाषणे झाली. प्राचार्य डॉ. डी. ए. चौगले यांनी प्रास्ताविक, प्रा. अक्षय चव्हाण यांनी परिचय दिला. यावेळी संचालक पी. बी. कवडे, मच्छिंद्रनाथ पाटील, विलास पाटील, पी. एस. पाटील, प्रा. डॉ. सुनील खराडे, उपप्राचार्य प्रा. डॉ. एन. एम. पाटील, आर. बी. हंकारे, प्रा. अनिल पाटील, प्रा. एन. एल. जमादार, प्रा. राहुल लहाने, प्रबंधक अजित कांबळे, प्रा. डॉ. संजय साळाेखे उपस्थित होते. प्रा. जयदीप कारंडे यांनी आभार मानले. प्रा. पवन पाटील व प्रा. तेजस्विनी भुईंगडे यांनी सूत्रसंचालन केले.