मतदार यादी मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मतदार यादी मागणी
मतदार यादी मागणी

मतदार यादी मागणी

sakal_logo
By

‘भोगावती’ ची प्रारुप यादी
गट ऑफिसमध्ये उपलब्ध करा

शाहूनगरः येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेली प्रारुप (कच्ची) मतदार यादी कार्यक्षेत्रातील कारखान्याच्या विभागीय गट ऑफिसमध्ये सभासदांना पाहण्यासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सभासदांमधून होत आहे. भोगावती कारखान्याच्या आगामी निवडणुकीसाठीची प्रारूप मतदार यादी कारखाना प्रशासनाने कारखान्याच्या प्रधान कार्यालयात लावली आहे. या यादीतील नावांबाबत सभासदांच्या काही तक्रारी असल्यास त्यांना १९ मे पर्यंत हरकती घेता येणार आहेत. कारखाना कार्यक्षेत्रातील सुमारे ५८ गावांमध्ये कारखान्याचे २७ हजार ५५८ सभासद आहेत. या सर्वांना कारखान्यामध्ये येऊन मतदार यादी पाहणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे त्यांच्या वेळेचा व पैशाचा अपव्यय होणार आहे. म्हणून सभासदांच्या सोयीसाठी निवडणूक विभागाने व कारखाना प्रशासनाने कारखान्याच्या राधानगरी व करवीर तालुक्यातील अकरा गट ऑफिसमध्ये सदरची प्रारूप मतदार यादी सभासदांना पाहण्यासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.