प्रोत्साहनपर अनुदानाप्रश्‍नी
आंदोलनाचा इशारा

प्रोत्साहनपर अनुदानाप्रश्‍नी आंदोलनाचा इशारा

प्रोत्साहनपर अनुदानप्रश्‍नी
आंदोलनाचा इशारा
शाहूनगर, ता. ३१ : नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनपर अनुदानापासून जिल्ह्यातील १६ हजार शेतकरी वंचित राहिले आहेत. त्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम त्वरित जमा करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते दशरथ पाटील-कौलवकर यांनी निवेदनातून दिला आहे.
याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे, राज्य शासनाकडून पीक कर्जाची नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला. परंतु अद्यापही जिल्ह्यातील १६ हजार शेतकरी या कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. त्यांच्या खात्यावर मार्चअखेर रक्कम जमा करण्याचे आश्‍वासन शासनाने दिले होते. मात्र जून महिना आला तरी अजूनही या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे प्रामाणिकपणे कर्जफेड करणारे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाने या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम त्वरित जमा करावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com