चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी
चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी

चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी

sakal_logo
By

चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी

शिराळा, ता. ५ : शिराळा तालुक्यात पावसाची संततधार कायम असून २४ तासांत चांदोली धरण परिसरात ८५ मि.मी. पावसाची नोंद झाल्याने अतिवृष्टी झाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून शिराळा तालुक्यात पावसाने सुरुवात केली असून, तालुक्यात आज दिवसभर पावसाची संततधार कायम आहे. सोमवारी सकाळी आठ ते मंगळवारी सकाळी आठ या २४ तासांत चांदोली धरण परिसरात ८५ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, आजअखेर २७३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आज धरणात ११.४६ टी.एम.सी. म्हणजे ३३.२९ टक्के पाणीसाठा आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्याने धरण व वारणा नदीच्या पाणी पातळीत काही प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. सायंकाळपासून शिराळा तालुक्यात पावसाचा जोर आणखी वाढला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Sla22b04691 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top