महाडिकांची कपबशी, पाटील- परिचारकांचे घड्याळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाडिकांची कपबशी, पाटील- परिचारकांचे घड्याळ
महाडिकांची कपबशी, पाटील- परिचारकांचे घड्याळ

महाडिकांची कपबशी, पाटील- परिचारकांचे घड्याळ

sakal_logo
By

महाडिकांची कपबशी, तर
पाटील- परिचारकांचे घड्याळ
सोलापूर, ता. ४ : मोहोळ तालुक्‍यातील टाकळी सिंकदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आज उमेदवारांना चिन्ह वाटप झाले. खासदार तथा कारखान्याचे अध्यक्ष धनंजय महाडिक यांच्या पॅनेलला कपबशी चिन्ह मिळाले आहे. त्यांच्याविरोधात असलेल्या माजी आमदार राजन पाटील व माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या पॅनेलला घड्याळ चिन्ह मिळाले आहे. महाडिक यांची भीमा शेतकरी विकास आघाडी, तर विरोधात पाटील-परिचारक यांची भीमा बचाव परिवर्तन आघाडी आहे. कारखान्याच्या १५ जागांसाठी ३५ उमेदवार मैदानात आहेत. त्यात पाच अपक्ष आहेत. अपक्षांना शिट्टी आणि बॅटरी चिन्ह मिळाले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी चिन्ह वाटप जाहीर केले.