सहा हजारांच्या मताधिक्‍यांनी महाडिकांचा विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहा हजारांच्या मताधिक्‍यांनी महाडिकांचा विजय
सहा हजारांच्या मताधिक्‍यांनी महाडिकांचा विजय

सहा हजारांच्या मताधिक्‍यांनी महाडिकांचा विजय

sakal_logo
By

सहा हजारांच्या मताधिक्‍यांनी महाडिकांचा विजय
भीमा कारखाना निवडणूक; परिचारक-पाटलांच्या भीमा बचाव पॅनेलचा धुव्वा

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १४ : सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक निकाल आज जाहीर झाला. भाजप खासदार व कारखान्याचे चेअरमन धनंजय महाडिक यांच्या पॅनेलला सर्वच्या सर्व १५ जागांवर दणदणीत विजय मिळाला आहे. माजी आमदार राजन पाटील व माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या भीमा बचाव पॅनेलचा जवळपास सहा ते साडेसहा हजार मताधिक्‍यांनी धुव्वा उडविला आहे.
भीमा कारखान्यासाठी रविवारी मतदान झाल्यानंतर आज सकाळी आठपासून सोलापुरातील सिद्धेश्‍वर साखर कारखान्याच्या मंगल कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली. १५ हजार ३१४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी दहा हजारांहून अधिक मते खासदार महाडिक यांच्या पॅनेलला मिळाली आहेत. या निवडणुकीची मतमोजणी दोन फेऱ्यांमध्ये झाली. पहिल्या फेरीत जवळपास ३ हजार ८०० मतांचे मताधिक्‍य महाडिक यांच्या उमेदवारांना मिळाल्याचे समजताच महाडिक समर्थकांना तुफान जल्लोष केला. रात्री साडेआठच्या सुमारास या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी काम पाहिले.

निकाल असा
व्यक्ती उत्पादक मतदारसंघ
* पुळुज : विश्वराज महाडिक (१०६२९ विजयी) व बिभीषण वाघ (१०२३७ विजयी), देवानंद गुंड ४१०३ व कल्याणराव पाटील ४१७२.
* टाकळी सिकंदर : संभाजी कोकाटे (१०५८८ विजयी) व सुनील चव्हाण (१०५६३ विजयी). शिवाजी भोसले ४१७०, राजाराम माने (३९७८)
* सुस्ते : तात्यासो नागटिकळ (१०७६४ विजयी) व संतोष सावंत (१०१३८ विजयी). पंकज नायगुडे (४२५१), विठ्ठल रणदिवे (३९८४), तानाजी घाडगे (३२)
* अंकोली : सतीश जगताप (१०१९० विजयी) व गणपत पुदे (१००३१ विजयी), भारत पवार (३९९५), रघुनाथ सुरवसे (३८६५)
* कोन्हारी : राजेंद्र टेकळे (१०५७१ विजयी), कुमार गोडसे (४३७४)
* उत्पादक सहकारी संस्था/बिगर उत्पादक संस्थ/पणन संस्था प्रतिनिधी : धनंजय महाडिक (३१ विजयी), राजेंद्र चव्हाण (१२)
* अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी : बाळासाहेब गवळी (१०७४६ विजयी), भारत सुतकर (४२१७), तानाजी कांबळे (३०)
* महिला प्रतिनिधी : सिंधू जाधव (१०७७८ विजयी) व प्रतीक्षा शिंदे (१०२९२ विजयी), अर्चना घाडगे (४१४१), सुहासिनी चव्हाण (४०२२)
* इतर मागासवर्ग प्रतिनिधी : अनिल गवळी (१०८६४ विजयी), राजाभाऊ भंडारे (४१५९), गिरीश गवळी (४१)
* भटक्‍या विमुक्त जाती/जमाती/विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी : सिद्राम मदने (१०७७८ विजयी) राजू गावडे (४१४९), मोहन गावडे (६६), नवनाथ अनुसे (१८)