शिक्षणाधिकारी लोहारांना जामीन की निलंबन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षणाधिकारी लोहारांना जामीन की निलंबन
शिक्षणाधिकारी लोहारांना जामीन की निलंबन

शिक्षणाधिकारी लोहारांना जामीन की निलंबन

sakal_logo
By

शिक्षणाधिकारी लोहारांना जामीन की निलंबन?
---
आज निर्णय अपेक्षित; लाचलुचपत ‘एसपीं’च्या परवानगीने होईल खुली चौकशी
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ६ : लाच प्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या जामिनावर उद्या (ता. ७) निर्णय होईल. दुसरीकडे, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी पाठविलेल्या निलंबनाच्या प्रस्तावावरही निर्णय अपेक्षित आहे.
कोल्हापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी पदावरून लोहारांची बदली सोलापूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून सप्टेंबर २०२१ मध्ये झाली. सुरुवातीला त्यांनी शिक्षक संघटनांच्या नेत्यांनाच ‘टार्गेट’ केले. आम्ही शिक्षकांसाठीच काम करतो, नेत्यांनी सांगायची गरज नाही, अशी त्यांची भूमिका होती. त्यावर शिक्षक संघटनांनी आंदोलनेही केली. परंतु, लोहार कोणतेही काम पैसे घेतल्याशिवाय करीत नाहीत, असा आरोप त्यांच्यावर १३ महिन्यांत झाला नाही. आता कारवाई झाल्यावर अनेकांनी शिक्षण विभागाचा पाढाच वाचायला सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने पाच वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांची बदली केली जाईल. तशा कर्मचाऱ्यांची यादी तयार झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे पोलिस अधीक्षकांना (लाचलुचपत) लोहारांच्या खुल्या चौकशीला परवानगी द्यावी, असे पत्र पाठविले. त्यांच्याकडून परवानगी मिळाल्यावर लोहारांच्या मालमत्तेसंदर्भात चौकशी होईल. लोहारांच्या जामिनावर आणि त्यांच्या निलंबनावरही उद्याच निर्णय होईल, अशी शक्यता आहे.

झेडपी कर्मचारी पुन्हा त्याच ठिकाणी
एकाच विभागात पाच वर्षांपेक्षा अधिक काम केलेल्या जिल्हा परिषदेतील विविध विभागांतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या काही महिन्यांपूर्वी झाल्या होत्या. त्यातील काही जण तालुक्याच्या ठिकाणी झालेली बदली रद्द करून पुन्हा त्याच जागेवर तथा त्याच विभागात रुजू झाल्याचे बोलले जात आहे. त्यामागील नेमकी कारणे कोणती, ही बाब अजूनही गुलदस्त्यातच आहे. आता लोहारांच्या निमित्ताने हा विषय चर्चेत आला असून, त्याची ‘सीईओ’ दिलीप स्वामी चौकशी करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.