शेकापचे जेष्ठ नेते माजी आमदार संपतराव पवार पाटील अमृत महोत्सवी वर्षानिमित्य घानवडे येथे वृक्षदिंडी वृक्षापण कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेकापचे जेष्ठ नेते माजी आमदार संपतराव पवार पाटील अमृत महोत्सवी वर्षानिमित्य घानवडे येथे वृक्षदिंडी वृक्षापण कार्यक्रम
शेकापचे जेष्ठ नेते माजी आमदार संपतराव पवार पाटील अमृत महोत्सवी वर्षानिमित्य घानवडे येथे वृक्षदिंडी वृक्षापण कार्यक्रम

शेकापचे जेष्ठ नेते माजी आमदार संपतराव पवार पाटील अमृत महोत्सवी वर्षानिमित्य घानवडे येथे वृक्षदिंडी वृक्षापण कार्यक्रम

sakal_logo
By

01106
घानवडे (ता. करवीर) ः येथे दिनकरराव व शामराव पवार पाटील शैक्षणिक, कला, क्रीडा मंडळ आयोजित कार्यक्रमात बोलताना माजी आमदार संपतराव पवार पाटील. शेजारी अशोकराव पवार पाटील, बाबासाहेब देवकर आदी.

फक्त जाहिरातींसाठी शेतकऱ्यांचा वापर
माजी आमदार संपतराव पवार पाटील; घानवडेत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

सोनाळी, ता. १६ ः शेतकऱ्यांची अवस्था खूपच बिकट असून, फक्त जाहिरातींसाठी शेतकऱ्यांचा वापर केला जात आहे. शासनकर्त्यांना वठणीवर आणण्यासाठी चळवळ हेच प्रभावी अस्त्र आहे, असे मत शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी केले.
घानवडे (ता. करवीर) येथे कै. दिनकरराव-शामराव पवार पाटील बंधू शैक्षणिक, कला, क्रीडा सांस्कृतिक संस्था आयोजित वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भोगावती साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केरबा भाऊ पाटील होते.
माजी आमदार संपतराव पवार पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वर्ष शुभारंभप्रसंगी घानवडे चव्हाणवाडी मार्गावर दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी झालेल्या सभेत कार्यकर्त्यांची एकसंध मोट बांधून शेकापचे पूर्वीचे वैभव मिळवावे, अशा भावना व्यक्त करण्यात आल्या. पवार पाटील यांच्या सामाजिक, राजकीय वाटचालीवर गौरव ग्रंथ निर्माण करण्याचे ठरले.
माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर, भरत पाटील, डॉ. टी. एस. पाटील, ॲड. बी. एम. पाटील, कुंडलिक कारंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य पुंडलिक पाटील, महादेव कोथळकर, कुंभी-कासारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष निवास वातकर, पंडित वरुटे यांची भाषणे झाली. यावेळी उत्तमराव वरुटे, एकनाथ पाटील, अंबाजी पाटील उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक दीपक तोरस्कर यांनी केले. अमित कांबळे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Sna22b00764 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top