सडोली खालसा येथे शनिवारीपासून कार्यक्रम- | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सडोली खालसा येथे
शनिवारीपासून कार्यक्रम-
सडोली खालसा येथे शनिवारीपासून कार्यक्रम-

सडोली खालसा येथे शनिवारीपासून कार्यक्रम-

sakal_logo
By

सडोली खालसा येथे
शनिवारपासून कार्यक्रम
सोनाळी, ता. १० : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त सडोली खालसा (ता. करवीर) येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शनिवारी (ता. १२) दुपारी १२ वा. महिला मेळावा व कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. अध्यक्षस्थानी सावित्रीच्या लेकी सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा शैला कुरणे असणार आहेत. दरम्यान, प्रमुख वक्ते व लेखिका मौनी विद्यापीठाच्या माजी प्राचार्य डॉ. लीला पाटील यांचे ‘समाज जडणघडणीत महिलांचे योगदान’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच महात्मा कृषी विद्यापीठ राहुरीचे पशुवैद्यकीय विभाग प्रमुख डॉ. संजय अस्वले यांचे दुग्धव्यवसाय व पशुसंगोपन या विषयावर, तर महिला बचत गट योजनांची माहिती आरती पाटील देणार आहेत. या वेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वैशाली सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती राजश्री ढवण, मीनाक्षी पाटील, ज्योती पाटील आदी उपस्थित रहाणार आहेत. रविवारी दुपारी १ वा. शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. अध्यक्षस्थानी भोगावती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केरबा भाऊ पाटील आहेत. या वेळी वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट पुणे ऊस शास्त्रज्ञ सुरेश माने पाटील यांचे उसाच्या सुधारित जाती व त्यांचे हंगामी नियोजन या विषयावर, तर मंडल अधिकारी नरेंद्र माने यांचे शासकीय योजना या षयी मार्गदर्शन होणार आहे. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव पवार पाटील, बाबासाहेब देवकर, अंबाजी पाटील, एकनाथ पाटील, बाबूराव कदम आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.