जिल्हात गुन्हाळघरांसमोर संकटाची मालिका, ८० टक्के गुऱ्हाळघरे बंद. मजुराची कमतरता, ७ ते ८ लाखांची तरतूद, कर्जफेडीसाठी तगादा. ७० ते ८० गुऱ्हाळघरे सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हात   गुन्हाळघरांसमोर संकटाची मालिका, ८० टक्के गुऱ्हाळघरे बंद. मजुराची कमतरता, ७ ते ८ लाखांची तरतूद, कर्जफेडीसाठी तगादा. ७०   ते  ८० गुऱ्हाळघरे सुरू
जिल्हात गुन्हाळघरांसमोर संकटाची मालिका, ८० टक्के गुऱ्हाळघरे बंद. मजुराची कमतरता, ७ ते ८ लाखांची तरतूद, कर्जफेडीसाठी तगादा. ७० ते ८० गुऱ्हाळघरे सुरू

जिल्हात गुन्हाळघरांसमोर संकटाची मालिका, ८० टक्के गुऱ्हाळघरे बंद. मजुराची कमतरता, ७ ते ८ लाखांची तरतूद, कर्जफेडीसाठी तगादा. ७० ते ८० गुऱ्हाळघरे सुरू

sakal_logo
By

संग्रहीत फोटो वापरणे.

गुऱ्हाळघरे अडकली
समस्यांच्या काहिलीत

मजुरांपासून मजुरीपर्यंत अडचणी; जिल्ह्यात ८० टक्के बंद अवस्थेत

सुरेश पाटील / सकाळ वृत्तसेवा

सोनाळी ता. १८ : कोल्हापूरच्या गुळाची ख्याती सातासमुद्रापार असली तरी गुन्हाळघरांपुढे अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. विविध अडचणींमुळे ७५ ते ८० टक्के गुऱ्हाळघरे बंद अवस्थेत आहेत. हा व्यवसाय वाचवण्यासाठी सरकारनेच पुढाकार घेणे गरजेचे आहे.
यंदा जादा पावसाने ऊस उत्पादनातील घट, व्यापाऱ्यांची मनमानी, मजुरांची कमतरता, रोगांचा प्रादुर्भाव, गूळ निर्मितीसाठी आवश्‍यक साहित्याच्या किमतीतील वाढ, बँकांचा कर्जासाठीचा तगादा आदी कारणांमुळे गुऱ्हाळमालक मेटाकुटीला आले आहेत. अनेक गुऱ्हाळमालकांनी बँकांकडे कमी व्याजदराने कर्जाची मागणी केली आहे. सध्या मोजकीच गुऱ्हाळघरे सुरू असल्याचे दिसून येते.
ऊस पिकावर जास्त पावसाने व रोगांनी आक्रमण केल्याने उत्पादनात ३० ते ४० टक्के घट होण्याची भीती आहे. गतवर्षी ऊस क्षेत्रात वाढ झाली. यंदा रोग व अतिपावसामुळे उसाची उंची वाढली नाही. त्यामुळे वजन घटणार आहे. मार्केटमधील गुळाचे सौदे अचानक बंद केल्याने गुळाचा दर्जा ढासळतो. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच गुऱ्हाळमालक तोटयात जातात. गूळ साठवणुकीबाबत दलालांच्या व्यवस्थापनातही अनेक त्रुटी आहेत. गुऱ्हाळघरांत काहींनी ७ ते ८ लाखांची गुंतवणूक केली आहे. मात्र तोटाच होत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी आहे. सध्या गुऱ्हाळघर मजुराला रोज २८० ते ३५० रु. मजुरीबरोबरच दोन किलो गूळ द्यावा लागतो. गुऱ्हाळघरमालकाचा विचार केल्यास एका आदणाला २२०० ते २५०० रु. खर्च येतो. याचा विचार केल्यास गूळ सहा हजाराच्या आसपास विकला गेला तरच ऊसशेती परवडेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या गुळाचा असणारा ३३०० ते ३४०० रु. दर शेतकऱ्यांना न परवडणारा आहे. दोन वर्षांपासून मजुरांची कमतरता आहे. काही ठिकाणी बिहारी मजूर असून अनेक ठिकाणी पुरुषांची जागा महिला मजुरांनी घेतल्याचे दिसून येत आहे.
..............
चौकट
वीज प्रश्न गंभीर
सतत खंडित वीजपुरवठयामुळे गुऱ्हाळमालक अडचणीत आले आहेत. वीज नसल्याने कामावरील मजुरांना बसून राहावे लागते. डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे डिझेलवर गुन्हाळघर चालवणेही शक्य होत नाही. यामुळे वीज वितरण कंपनीने विचार करावा.

कोट
३४०० ते ३५०० रु. दर गुऱ्हाळमालकांना न परवडणारा आहे. वीज, मजुरांचा पगार व इतर खर्च वजा जाता हा दर तोटयाचा आहे. त्यामुळे सरासरी ५५०० ते ६००० रु. दर दिला तरच गुऱ्हाळघरे सुरू राहतील, अन्यथा गुन्हाळघरे कायमची बंद करावी लागतील.
- दिगंबर अतिग्रे, गुऱ्हाळमालक, हिरवडे खालसा

शेतीसाठी खते, बी-बियाणे, नांगरट, पाणी, मशागत, मनुष्यबळ आदी खर्च शेतकऱ्यांना जास्त असल्याने गुळाला ६००० पर्यंत दर मिळाला तरच शेती करणे परवडते.
- बाळासाहेब नागावकर-पाटील, शेतकरी, गाडेगोंडवाडी