Fri, Jan 27, 2023

न्यू इंग्लिश स्कूल कांचनवाडीचे यश
न्यू इंग्लिश स्कूल कांचनवाडीचे यश
Published on : 24 December 2022, 3:12 am
न्यू इंग्लिश स्कूल, कांचनवाडीचे यश
सोनाळी : न्यू इंग्लिश स्कूल कांचनवाडीच्या (ता. करवीर) विद्यार्थिनींनी मैदानी क्रीडा स्पर्धेत यश मिळविले. १०० मीटर धावणे गटात राजश्री पाटील हिने तिसरा क्रमांक पटकावला. तसेच ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये धनश्री कोपार्डे, गौरी भोसले, राजश्री पाटील, ऐश्वर्या पाटील यांनी तृतीय क्रमांक मिळविला. विद्यार्थिनींना संस्थाध्यक्ष भोगावती साखर कारखान्याचे माजी संचालक शंकर दादू पाटील, उपाध्यक्ष आनंदराव भोसले, सचिव कृष्णात सुतार, क्रीडा शिक्षक डी. जी. पाटील, एस. के. पाटील, मुख्याध्यापक एस. एस. वरपे यांचे मार्गदर्शन लाभले.