भव्य पालखी मिरवणूक सोहळयाने बिरदेव यात्रेची सांगता. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भव्य पालखी मिरवणूक सोहळयाने बिरदेव यात्रेची सांगता.
भव्य पालखी मिरवणूक सोहळयाने बिरदेव यात्रेची सांगता.

भव्य पालखी मिरवणूक सोहळयाने बिरदेव यात्रेची सांगता.

sakal_logo
By

01447
‘बिरदेवाच्या नावानं चांगभल...’
वाशी बिरदेव यात्रेची सांगता; पालखी सोहळ्यास भाविकांची उपस्थिती

सोनाळी, ता. २७ ः चार राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान, वाशीचे ग्रामदैवत बिरदेवाचा भव्य पालखी मिरवणूक सोहळा सुरू झाला. ढोल-कैताळाचा निनाद, भंडाऱ्याची मुक्त उधळण करत ‘बिरदेवाच्या नावानं चांगभल...’च्या जयघोषात पालखी सोहळा मुख्य मंदिरातून भानुस मंदिरात येऊन यात्रेची सांगता झाली.
यात्रा काळात बिरदेव दर्शनासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती. यात्रेच्या सांगतेनंतर बिरदेवाच्या आशीर्वादाची शिदोरी घेऊन जड पावलांनी भाविक,भक्त परतीच्या मार्गावर लागले. यात्रा काळात सलग तीन-चार दिवस ढोल-वादन, धनगरी ओवी, गजनृत्य, हेडाम, भाकणूक, नवसाच्या मुलांची उधळण व इतर धार्मिक कार्यक्रमांसह तरुण मंडळे, भाविकांच्या आंबील गाड्यांच्या भव्य मिरवणुकीने यात्रा उत्साहात पार पडली.
सुहासिनी, माहेरवाशीण महिलांनी देवाच्या दारात बांगड्या भरून सोबत भंडारा घेत बिरदेवाकडे कुटुंबाच्या सुख-समृद्धीचे व रक्षणाचे मागणे मागत यात्रेचा निरोप घेतला. ग्रामपंचायत प्रशासन,आरोग्य विभाग यांनी सतर्क राहून यात्रा काळात भाविक आणि ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेतली.
यात्रेदरम्यान प्रशासक व्ही. बी. नलवडे, ग्रामविकास अधिकारी पी. एम. भोपळे, आरोग्य अधिकारी अनिल गंबरे, सचिन तेबिले, अध्यक्ष रघुनाथ पुजारी, उपाध्यक्ष रंगराव रानगे, सचिव धनाजी रानगे, बबनराव रानगे, कृष्णात पुजारी, सुरेश पुजारी, आनंदा पुजारी आरेकर यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी धनगर समाजबांधव व ग्रामस्थांनी यात्रा चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी श्रम घेतले.