हसूर दुमाला येथील अंबाबाई मांड उत्सवाचा आज मुख्य दिवस. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हसूर दुमाला येथील अंबाबाई मांड उत्सवाचा आज मुख्य दिवस.
हसूर दुमाला येथील अंबाबाई मांड उत्सवाचा आज मुख्य दिवस.

हसूर दुमाला येथील अंबाबाई मांड उत्सवाचा आज मुख्य दिवस.

sakal_logo
By

हसूर दुमालात आज
मांड उत्सवाचा मुख्य दिवस

सोनाळी : हसूर दुमाला (ता. करवीर) येथील श्री अंबाबाई मांड उत्सवास सुरुवात झाली असून, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (ता.१२) मांडाचा मुख्य दिवस आहे. या उत्सवात विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. फाल्गुन, कृष्णपंचमी म्हणजे रंगपंचमी दिवशी मोठ्या उत्साहात मांड उत्सव साजरा करण्यात येणार आहे. शेकडो वर्षांपासून हा उत्सव साजरा केला जातो. मांड उत्सवात पालखी सोहळा, गाऱ्हाणे तसेच देवीची दररोज महापूजा, धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. पालखी सोहळ्यादिवशी फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार असून, पहिल्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात येतो. रविवारी रंगपंचमी दिवशी दुपारी कमिटीतर्फे घरोघरी सर्व देवतांना रंग लावण्यासाठी ट्रॅक्टरमधून रंग वाटण्यात येणार आहे. या उत्सवानिमित्त उभारलेली सासनकाठी गुढीपाडव्यादिवशी उतरवली जाणार आहे. तसेच रात्री तमाशासह विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे उत्सव कमिटीतर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.