राजाराम साखर कारखान्याच्या निवडणूकीत सतांतर न झाल्यास कारखान्याचा सातबारा महाडिकांच्या नावावर होईल., सतेज उर्फ बंटी पाटील. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजाराम साखर कारखान्याच्या निवडणूकीत सतांतर न झाल्यास कारखान्याचा सातबारा महाडिकांच्या नावावर होईल., सतेज उर्फ बंटी पाटील.
राजाराम साखर कारखान्याच्या निवडणूकीत सतांतर न झाल्यास कारखान्याचा सातबारा महाडिकांच्या नावावर होईल., सतेज उर्फ बंटी पाटील.

राजाराम साखर कारखान्याच्या निवडणूकीत सतांतर न झाल्यास कारखान्याचा सातबारा महाडिकांच्या नावावर होईल., सतेज उर्फ बंटी पाटील.

sakal_logo
By

01477

...तर ‘राजाराम’चा सातबारा
महाडिकांच्या नावावर

सतेज पाटील; वाशीत संपर्क सभा

सोनाळी, ता. १५ : छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्तांतर न झाल्यास कारखान्याचा सातबारा महाडिकांच्या नावावर होईल, असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले. वाशी (ता. करवीर) येथे विठ्ठल मंदिरात राजाराम कारखाना निवडणुकीच्या संपर्क दौऱ्यानिमित्त सभेदरम्यान बोलताना केले. अध्यक्षस्थानी बापूसो पाटील होते.
वाशीचे ग्रामदैवत बिरदेव दर्शन व सत्कार सोहळ्याप्रसंगी देवस्थानचा ‘ब’ वर्ग प्रस्ताव मार्गी लावू व बिरदेव मंदिर सुशोभीकरणासाठी दहा लाख देण्याची घोषणा माजी मंत्री पाटील यांनी केली.
श्री. पाटील म्हणाले, ‘जिल्ह्यात एकमेव कमी दर देणारा राजाराम कारखाना आहे. तेरा हजार सभासदांच्या अस्तित्वासाठी मैदानात उतरलो असून राजाराम कारखान्यात परिवर्तन अटळ आहे. राजकीय स्वार्थापोटी मयत सभासदांच्या वारसांना सभासत्वापासून वंचित ठेवले आहे. कारखान्याची सत्ता येताच मयत सभासदांच्या वारसांना बोलावून त्यांच्या नावे शेअर ट्रान्सफर करू.’
माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांनी, महाडिक भविष्यात कारखाना संपवतील, अशी टीका महादेवराव महाडिक व अमल महाडिकांवर यांच्यावर केली. यावेळी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका उदयानी साळुंखे, मल्हार सेना सरसेनापती बबनराव रानगे, राष्ट्रवादी व्हीजीएनटीचे जिल्हाध्यक्ष कृष्णात पुजारी यांनी मनोगत व्यक्त केली.
सभेवेळी भोगावतीचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, शारंगधर देशमुख, महादेव पाटील, सुरेश पाटील, आप्पासो हजारे, लक्ष्मण पुजारीसह विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. प्रास्ताविक संदीप पाटील, दत्तात्रय हजारे यांनी आभार मानले.