देवाळचे कुस्ती मैदान वैभव पाटील मारले.

देवाळचे कुस्ती मैदान वैभव पाटील मारले.

01492

देवाळेचे मैदान वैभव पाटीलने मारले
आंबील यात्रेनिमित्त आयोजन;शंभरपेक्षा जास्त कुस्त्या

सोनाळी, ता. २५ : देवाळे (ता. करवीर) येथील ग्रामदैवत अंबाबाई यात्रेनिमित्त आयोजित मोफत कुस्त्यांचे मैदान नंदवाळच्या वैभव पाटीलने मारले. त्याने राशिवडे (ता. राधानगरी) येथील शुभम चिक्कलहाळ याला अस्मान दाखवत प्रथम क्रमांकाची कुस्ती जिंकली. महाराष्ट्र राज्य क्रीडा मंडळाचे माजी सदस्य संग्राम साळोखे व सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेशकुमार मेंगडे यांच्या सहकार्याने स्पर्धा झाल्या. द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीत मुंडे तालमीच्या भरत चव्हाण यांनी महे येथील ओंकार पाटील याला चितपट केले तर तृतीय क्रमांकाच्या कुस्तीत मोतीबाग तालमीच्या विश्वजित पाटील याने राशिवडेच्या सनी अस्वले याला चितपट केले. दरम्यान ३० ते ८० किलो अशा लहान व मोठ्या वजनी गटापर्यंत शंभरपेक्षा जास्त कुस्त्या झाल्या.
मोठ्या गटातील विजयी मल्लांमत अरुण पाटील (भामटे), पार्थ कळंत्रे (बाचणी), निशांत पाटील (सडोली खालसा), ओम पाटील (बाचणी), रोहन खाडे (कोगे), सुहास पोवार (इस्पुर्ली), श्रीधर पाटील (राशिवडे), अर्जुन पाटील (राशिवडे),राजवीर पाटील (महे), शंभूराज सासणे (पोर्ले), सुजित गिरी (राशिवडे), संभाजी धुंधरे (राशिवडे), आकाश पाटील (सडोली खालसा) यांचा समावेश आहे. भोगावती साखर कारखान्याचे संचालक प्रा. शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते आखाडापूजन झाले. यावेळी राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू शरद पोवार, प्रा. डॉ. निवास पाटील, कृष्णात हुजरे, विश्वास पाटील यांच्यासह यात्रा समितीचे सदस्य उपस्थित होते. पंच म्हणून बाजीराव कळंत्रे, शंकर मेडसिंगे, संभाजी मगदूम, मल्हारी पाटील, वसंत लांडगे यांनी काम पाहिले. प्रा. पवन पाटील व साईनाथ पाटील यांनी कुस्ती समालोचन व सूत्रसंचालन केले. प्रा.विश्वास पाटील यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com