
कोथळी सरपंच रुपाली पाटील यांना राष्ट्रीय आदर्श सरपंच पुरस्कार.
01514
कोथळीच्या रूपाली पाटील ‘आदर्श सरपंच’
सोनाळी ः कोथळी (ता. करवीर) येथील सरपंच रूपाली विलासराव पाटील यांना राष्ट्रीयस्तरावरील आदर्श सरपंच गौरव पुरस्कार प्रदान केला. गोव्यातील कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावन्नूर यांच्या हस्ते व माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोहली, बिदर जिल्हा पोलिसप्रमुख महेश मेघनावर, जिल्हा होमगार्ड कमांडर अरविंद गट्टी, माजी खासदार बॅरिस्टर अरविंद सिंह पाटील, माजी आमदार संपतराव पवार पाटील, कोल्हापूरचे माजी महापौर राजू शिंगाडे प्रमुख उपस्थित होते. त्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविले. यावेळी उपसरपंच धीरजसिंह आमते, सागर पाटील, ग्रामसेवक सतीश पानारी उपस्थित होते. हा पुरस्कार नॅशनल रोलर डेव्हलपमेंट फाउंडेशन व इंटरनेट ग्रेडड सोशल वेल्फेअर सोसायटी जि. बेळगावतर्फे सामाजिक, शैक्षणिक, शासकीय, निमशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय व अतुलनीय कामाबद्दल रूपाली पाटील यांना पुरस्कार मिळाला.